AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येरवडा जेलमधून सुटल्यावर मुंबई गाठली, डोक्यात फरशी घालून सासूची हत्या

सासूने तिच्या मुलीचा, अर्थात आरोपीच्या पत्नीचा पत्ता सांगण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात टाईल्सने जोरदार घाव घालून हत्या केली, असे या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

येरवडा जेलमधून सुटल्यावर मुंबई गाठली, डोक्यात फरशी घालून सासूची हत्या
तुरुंगातून सुटल्यानंतर जावयाकडून सासूची हत्या
| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 8:54 AM
Share

मुंबई : तुरुंगातून सुटल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच तरुणाने आपल्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर 42 वर्षीय जावयाने मुंबईत येऊन आपल्या सासूबाईंचा जीव घेतला. बायकोचा ठावठिकाणा सांगण्यास सासूने नकार दिल्याच्या रागातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सासूने तिच्या मुलीचा, अर्थात आरोपीच्या पत्नीचा पत्ता सांगण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात टाईल्सने जोरदार घाव घालून हत्या केली, असे या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी अब्बास शेखला दरोडा टाकल्याच्या प्रकरणात 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. गेल्या आठवड्यात त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगातून सुटका झाली. दोन दिवसांनंतर त्याने मुंबई गाठली. पत्नीचा नवा पत्ता जाणून घेण्यासाठी शेख गेल्या आठवड्यात दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास सासूच्या घरी गेला होता.

डोक्यात फरशीचे वार

सासूने तुरुंगाबाहेर आलेल्या जावयाला लेकीचा पत्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे घरातच दोघांमध्ये मोठा वादविवाद झाला. त्यानंतर, चिडलेल्या जावयाने घरातच तिच्या डोक्यावर फरशीने अनेक वेळा वार करुन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. वृद्ध महिला राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्यामुळे मुंबईतील विलेपार्ले भागात गेल्या आठवड्यात एकच खळबळ उडाली होती.

दारुच्या बाटल्या पळवून पोबारा

दरम्यान, पुढील तपासात असे दिसून आले की सासूची तिच्या विलेपार्ले पूर्वेकडील घरात हत्या केल्यानंतर त्याने जवळच्या रेस्टॉरंटचे मालक आणि व्यवस्थापकासही धमकावले आणि त्यांच्याकडून तीन हजार रुपये उकळले. पुण्याला पळून जाण्यापूर्वी आरोपीने दारूच्या दोन बाटल्याही पळवून नेल्या होत्या. यामुळे त्याच्यावर खुनासह खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला हत्या प्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली.

पुण्यात ब्लाऊजने गळा आवळून सासूची हत्या

दुसरीकडे, घरगुती वादातून सुनेने सासूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. हत्येनंतर सासूचा मृतदेह पोत्यात भरुन सूनेने झुडपात फेकला. मात्र या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलगा-सूनेला अटक केली होती. बेबी गौतम शिंदे असे हत्या झालेल्या सासूचे नाव होते. आरोपी पूजा मिलिंद शिंदे हिचे सासूसोबत किरकोळ घरगुती कारणांवरुन वाद सुरु होते. त्याचाच राग मनात धरुन पूजाने ब्लाऊजच्या सहाय्याने गळा आवळून सासूचा खून केला होता. हत्येनंतर सासूचा मृतदेह तिने पोत्यात लपवला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह भरलेलं पोतं तिने आधी टेरेसवर ठेवलं होतं. मात्र मृतदेह झुडपात टाकत असताना स्थानिक तरुणांनी पूजाला पाहिलं. शंका आल्यामुळे त्यांनी पोलिसांशी संपर्क केला असता ही घटना उघडकीस आली.

संबंधित बातम्या :

ब्लाऊजने गळा आवळून सासूची हत्या, पोत्यात भरुन मृतदेह झुडपात फेकला, पिंपरीत मुलगा-सूनेला अटक

सासूच्या हत्येची फिर्याद देणारी सूनच निघाली खूनी, जमिनीसाठी दोरीने गळा आवळून हत्या

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.