AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेजारच्या महिलेला मम्मा म्हटल्याने राग अनावर, आईने ओलांडली क्रूरतेची सीमा; वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा

भिवंडीतील बापगाव येथे ३ वर्षांच्या दत्तक मुलीने दुसऱ्या महिलेला मम्मा म्हटल्याने सावत्र आईने तिच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण केली. या प्रकरणी पडघा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

शेजारच्या महिलेला मम्मा म्हटल्याने राग अनावर, आईने ओलांडली क्रूरतेची सीमा; वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा
Women child beat
| Updated on: Mar 08, 2026 | 7:41 AM
Share

माणुसकीला आणि मातृत्वाला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि अमानुष घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप दत्तक मुलीने शेजारील एका महिलेला मम्मा अशी हाक मारली, याचा राग मनात धरून तिच्या सावत्र आईने क्रूरतेचा कळस गाठला. या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या सावत्र आईने चिमुरडीला घरात कोंडून तिच्या डोळ्यात आणि तोंडात तिखट मिरची पावडर टाकली आणि तिला बेदम मारहाण केली. भिवंडी तालुक्यातील पडघा जवळ असलेल्या बापगाव येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष कृत्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या बापगाव येथील रहिवासी दिलशान शेख हिने एका तीन वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले होते. ही मुलगी त्यांच्यासोबतच राहत होती. काही दिवसांपूर्वी या चिमुरडीने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला प्रेमाने मम्मा अशी हाक मारली. ही गोष्ट दिलशान शेख हिला सहन झाली नाही. या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या दिलशानने चिमुरडीला घरात कोंडले. यानंतर तिच्या डोळ्यात आणि तोंडात तिखट मिरची पावडर टाकून तिला बेदम मारहाण केली.

या अमानुष कृत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आरोपी महिलेचा पती तिला हे कृत्य करण्यापासून थांबवताना दिसत आहे. मात्र तरीही ती महिला चिमुरडीवर अत्याचार करत राहिली. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. या प्रकरणी पडघा पोलिसांनी मुख्य आरोपी सावत्र आई दिलशान शेख, तिचा पती शौकत समसूद्दीन शेख आणि मुलीला दत्तक देणारा उमेश येवले या तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. उमेश येवले याने नेमक्या कोणत्या परिस्थितीत आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पीडित चिमुरडीची या क्रूर महिलेच्या तावडीतून सुटका केली आहे. सध्या या निष्पाप मुलीला पुढील सुरक्षिततेसाठी आणि उपचारांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे पालकांच्या भूमिकेवर आणि दत्तक प्रक्रियेच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!