AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS बनायचं होतं पण झाला अभिनेता, वडील होते थिएटर मालक, पण आर्थिक परिस्थितीमुळे विकावा लागला चहा

बॉलिवूडमधील या अभिनेत्याला व्हायचे होते आयएएस. वडील होते थिएटर मालक. पण आर्थिक संकटामुळे आली चहा आणि लॉटरी विकण्याची वेळ. 22 व्या वर्षा बनला अभिनेता.

IAS बनायचं होतं पण झाला अभिनेता, वडील होते थिएटर मालक, पण आर्थिक परिस्थितीमुळे विकावा लागला चहा
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 08, 2026 | 7:51 AM
Share

Bollywood Actor : बॉलिवूडमध्ये असे फार कमी कलाकार आहेत जे उच्च शिक्षित आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात सहसा पदवी किंवा मोठे शिक्षण यापेक्षा प्रतिभावान अभिनयाला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे अनेक कलाकार शिक्षणाऐवजी अभिनयाकडे अधिक लक्ष देतात. मात्र आज आपण अशा एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे स्वप्न आयएएस अधिकारी होण्याचे होते. पण घरातील परिस्थिती आणि रंगभूमीचे वातावरण यामुळे त्यांचे आयुष्य वेगळ्याच मार्गाने वळले. हा अभिनेता म्हणजे अन्नू कपूर.

अन्नू कपूर यांचा जन्म मध्य प्रदेशातील भोपाळ येथील इटवारा परिसरात झाला. त्यांचे मूळ नाव अनिल कपूर होते. मात्र नंतर बॉलिवूडमधील दुसऱ्या प्रसिद्ध अभिनेत्यामुळे त्यांनी आपले नाव बदलून ‘अनु कपूर’ असे ठेवले. पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या अनु कपूर यांच्या वडिलांचे नाव मदनलाल कपूर होते. ते पारसी थिएटर कंपनी चालवत असत. त्यामुळे अनु कपूर यांना बालपणापासूनच रंगमंचाचे वातावरण मिळाले.

त्यांची आई कमला शबनम या बंगाली ब्राह्मण कुटुंबातील होत्या. त्या उर्दू भाषेच्या शिक्षिका आणि प्रशिक्षित शास्त्रीय गायिका होत्या. मात्र त्यांचा महिन्याचा पगार फक्त 40 रुपये होता. सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते. पण काळ बदलत गेला आणि पारसी थिएटरचे दिवस ओसरू लागले. थिएटर कंपन्या बंद होऊ लागल्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले.

आर्थिक संकटामुळे सोडावी लागली शाळा

घरची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्यामुळे अनु कपूर यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. आयएएस अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्नही अपूर्ण राहिले. आर्थिक अडचणी इतक्या वाढल्या की त्यांना जगण्यासाठी चहा विकावा लागला. त्याशिवाय त्यांनी गोळ्या आणि लॉटरी तिकीटसुद्धा विकली. विशेष म्हणजे त्या काळात त्यांना अभिनेता होण्याची अजिबात इच्छा नव्हती.

मात्र, वडिलांच्या आग्रहामुळे त्यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी लहान-लहान गावांमध्ये आणि शहरांमध्ये नाटकांचे प्रयोग केले. अनु कपूर यांनी 250 पेक्षा अधिक पारसी आणि लोकनाट्यांमध्ये काम केले आहे. केवळ 22 वर्षांच्या वयात त्यांनी एका नाटकात 70 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारून प्रेक्षकांची दाद मिळवली होती.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी