AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखरपुडा मोडला, नंतर लग्नच केले नाही! वयाच्या 54व्या वर्षी तब्बू का आहे सिंगल?

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता तिचा साखरपुडा मोडल्याचे समोर आले आहे. नेमकं काय घडलं होतं? वाचा...

साखरपुडा मोडला, नंतर लग्नच केले नाही! वयाच्या 54व्या वर्षी तब्बू का आहे सिंगल?
TabuImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 9:11 AM
Share

झीनत अमानपासून शबाना आझमीपर्यंत अनेक भारतीय अभिनेत्रींनी पडद्यावर सशक्त आणि महिला-प्रधान भूमिका करून रूढीवादी धारणे तोडली आहेत. त्यापैकी एक आहे तबस्सुम फातिमा हाशमी, जी ‘तब्बू (Tabu)’ या नावाने ओळखली जाते. हिंदी चित्रपटात पारंपरिक मार्गाने वेगळ्या भूमिका साकारल्याबद्दल त्या खूप प्रसिद्ध आहेत. ‘चांदनी बार’मधील त्यांचा अभिनय असो वा ‘माचिस’मधील सुसाईड बॉम्बरची भूमिका, त्यांनी नेहमी उत्कृष्ट भूमिका निवडल्या आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ४ नोव्हेंबर १९७१ रोजी हैदराबादी मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या तब्बूचे वडील जमाल अली हाशमी भारत येण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये अभिनेते होते. तब्बू तीन वर्षांच्या असताना त्यांचे वडील कुटुंब सोडून गेले आणि त्यांच्या आईने एकट्यानेच त्यांचे पालनपोषण केले.

तब्बूने कधीही आपल्या नावासोबत वडिलांचे आडनाव वापरले नाही. सिमी गरेवाल यांच्या ‘रेंडेवू विथ सिमी गरेवाल’ शोमध्ये बोलताना तब्बूने याबाबत सांगितले. ती म्हणाली की, “मी कधीही माझे आडनाव वापरले नाही. मला कधीही असे वाटले नाही की वडिलांचे आडनाव वापरणे आवश्यक आहे. माझे नाव नेहमी ‘तबस्सुम फातिमा’ असेच होते, जिथे ‘फातिमा’ माझे मिडल नेम होते. शाळेत ‘फातिमा’ हेच माझे सरनेम असे. मला त्यांच्या (वडिलांच्या)बद्दल काहीही आठवत नाही. माझी बहीण कधीकधी त्यांना भेटली आहे, पण मला त्यांना भेटण्याची कधी इच्छा झाली नाही. मला त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची कोणतीही उत्सुकता नाही. मी जशी आहे, जशी मोठी झाले, त्यातच मी आनंदी आहे. मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे सेटल आहे.”

साऊथ सिनेमांमध्येही केले काम

तब्बूने केवळ हिंदी चित्रपटातूच प्रेक्षकांचे मन जिंकले नाही तर ‘निन्ने पेल्लादाता’, ‘कालापानी’, ‘कधल देसम’, ‘इरुवर’ आणि इतर अनेक चित्रपटांद्वारे प्रादेशिक चित्रपटातही आपली वेगळी छाप सोडली आहे. वेगळ्या प्रकारच्या भूमिका निवडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तब्बूने अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांत काम केले आहे. त्यात ‘प्रेम’, ‘हकीकत’, ‘हिम्मत’, ‘जीत’, ‘मकबूल’, ‘द नेमसेक’, ‘चीनी कम’, ‘हैदर’ आणि काही इतर चित्रपटांचा समावेश आहे.

तब्बूचे अफेअर आणि साखरपुड्याच्या अफवा

चार दशकांपेक्षाही जास्त काळाच्या कारकिर्दीत तब्बूचे नाव अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत जोडले गेले आहे. असे म्हटले जाते की तिचा पहिला बॉयफ्रेंड संजय कपूर होता. दोघांनी ‘प्रेम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांना डेट करायला सुरुवात केली, पण काही काळानंतर ते वेगळे झाले. तब्बूचे नाव निर्माता साजिद नाडियाडवालासोबतही जोडले गेले होते. ‘जीत’ चित्रपटात एकत्र काम करताना त्यांच्यात जवळीक वाढली. रिपोर्ट्सनुसार दोघांचा साखरपुडा झाला होता, पण साजिद तब्बूसोबतच्या नात्याबाबत पूर्णपणे कमिटेड होऊ शकला नाही, कारण त्यांच्या मनात अजूनही दिवंगत पत्नी दिव्या भारतीच्या आठवणी होत्या. मात्र या साखरपुड्याची कधीही अधिकृत पुष्टी झाली नाही.

तब्बूचे आणखी एक नाते ज्याची खूप चर्चा झाली, ते म्हणजे साउथ इंडियन सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन यांच्यासोबत होते. रिपोर्ट्सनुसार तब्बूला स्थिर नाते हवे होते, पण आधीच विवाहित असलेले नागार्जुन कोणतेही पक्के वचन देऊ शकले नाहीत. कथितरित्या १० वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघे वेगळे झाले.

Follow Us
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!