AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : न्यूझीलंडचा संघ पेटून उठला, चौथ्या वनडेत टीम इंडियाचा सर्वात मोठा दारुण पराभव, आपल्याला धूळ चारली

IND vs NZ : चौथ्या वनडे मॅचमध्ये न्यूझीलंडच्या टीमने दमदार प्रदर्शन केलं. भारतीय संघाला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. ज्या पीचवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 300 प्लस धावा केल्या. त्या पीचवर भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले.

IND vs NZ : न्यूझीलंडचा संघ पेटून उठला, चौथ्या वनडेत टीम इंडियाचा सर्वात मोठा दारुण पराभव, आपल्याला धूळ चारली
IND vs NZ Image Credit source: PTI
| Updated on: Nov 13, 2026 | 2:25 PM
Share

यंदाच्या न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचा सर्वात मोठा पराभव झाला आहे. सततच्या पराभवाने न्यूझीलंडचा संघ पेटून उठला. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा तब्बल 244 धावांनी पराभव केला. टीम इंडियाचा हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे. चौथ्या वनडे मध्ये न्यूझीलंडच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 333 धावा केल्या. विजयसाठी दिलेल्या 334 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 89 धावात आटोपला. ज्या पीचवर न्यूझीलंडच्या टीमने 300 प्लस रन्स केल्या. तिथे भारतीय फलंदाजांना 100 धावाही करता आल्या नाहीत. याचा अर्थ पीच मध्ये प्रॉब्लेम नव्हता तर भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा मुकाबला करु शकले नाहीत.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे भारताचे टॉप फलंदाज 10 धावांच्या आत तंबूत परतले. 9 रन्सवर चार विकेट अशी स्थिती होती. रोहित शर्मा पहिल्याच बॉलवर आऊट झाला. रोहितने भोपळाही फोडला नाही. विराट कोहली सुद्धा शून्यावर आणि श्रेयस अय्यरही भोपळाही फोडू शकला नाही. तिघे शुन्यावर बाद झाले. दुसरा ओपनर ऋतुराज गायकवाडने 5 धावांवर आऊट झाला. मॅट हेनरी भारतीय फलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. त्याने 9.4 ओव्हरमध्ये 27 धावा देत त्याने सहाविकेट काढले. टीम इंडियाकडून इशान किशनने सर्वाधिक 27 धावा केल्या.

न्यूझीलंडला विजय आवश्यक होता

अक्षर पेटल (21) आणि नमन धीरने (21) धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त टीम इंडियाचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टीकाव धरु शकला नाही. न्यूझीलंडकडून विल यंगने 108 चेंडूत 125 धावांची शतकी खेळी केली. त्याने भारतीय गोलंदाजांची पिसं काढला. 14 फोर आणि चार सिक्स त्याने मारले. टीम सायफर्टने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 85 धावांची पार्टनरशिप केली. पाच सामन्यांच्या वनडे सीरीजमध्ये आव्हान टिकवून ठेवण्यासाठी न्यूझीलंडला विजय आवश्यक होता. मालिकेत आता 2-1 अशी स्थिती आहे.

View this post on Instagram

A post shared by BLACKCAPS (@blackcapsnz)

आता पाचवी वनडे दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. टीम इंडियाला मालिका जिंकण्यासाठी तर न्यूझीलंड मालिका हातातून जाऊ नये यासाठी विजय आवश्यक आहे. टी20 सीरीज आधीच त्यांनी 3-2 ने गमावली आहे. भारताने पहिले दोन्ही सामने डकवर्थ लुईसने जिंकले. न्यूझीलंडच्या आजच्या विजयात जितका शानदारपणा आहे, तितका तो भारताच्या याआधीच्या दोन विजयात दिसला नाही.

Follow Us
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा
पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही
NCP Merger : पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान पुण्यात राजकीय खलबतं
सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; संजय राऊतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ
Gokul Milk Price Hike : गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका