11 गरोदर मातांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात

| Updated on: Feb 01, 2023 | 5:54 PM

तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण घेऊन रुग्णवाहिका शहादा येथील लोणखेडा कॉलेजच्या गेटसमोर होती. त्यावेळी अचानक ही रुग्णवाहिका उलटली. या रुग्णवाहिकेत 11 गरोदर माता होत्या.

11 गरोदर मातांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात
दोन दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Follow us on

नंदुरबार : शहादाजवळ एका रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे ही रुग्णवाहिका गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जात होती. शहादा येथील लोणखेडा कॉलेज गेटसमोर रुग्णवाहिका उलटल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी जमाव जमला होता.  सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना शहादा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण घेऊन रुग्णवाहिका शहादा येथील लोणखेडा कॉलेजच्या गेटसमोर होती. त्यावेळी अचानक ही रुग्णवाहिका उलटली. या रुग्णवाहिकेत 11 गरोदर माता होत्या.

कशी उलटली रुग्णवाहिका

हे सुद्धा वाचा

तेलखेडी येथील येणाऱ्या रुग्णवाहिकेचा वेग अधिक होता. त्यामुळे लोणखेडा कॉलेजच्या गेटसमोर चालक नियंत्रण करु शकला नाही. यामुळे रुग्णवाहिका उलटली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रुग्णवाहिकेचा अपघात झाल्यानंतर जमाव जमला. त्यांनी रुग्णवाहिकेतून गरोदर मातांना बाहेर काढले.