AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, चार प्रवाशांचा मृत्यू

बसचे टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरवर बस आदळली. या अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली.

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, चार प्रवाशांचा मृत्यू
अपघात
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 24, 2023 | 11:49 AM
Share

पुणे : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Solapur Expressway) बुधवारी सकाळी भीषण अपघात (Accident)झाला. बस आणि ट्रकच्या झालेल्या या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृत झालेले चौघे जण बसमधील प्रवाशी होते. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे (वय ३६) अमर मानतेश कलशेट्टी (वय २०), गणपत मलप्पा पाटील (वय ५५), आरती बिराजदार (वय २५) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्याच्या हद्दीत चौफुलावर अपघात झाला. सोलापूरहून पुण्याकडे ही लक्झरी बस निघली होती. या बसचे टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरवर बस आदळली. या अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान आणखी दोन जणांचे निधन झाले. या अपघातातील जखमींना केडगाव येथील दवाखान्यात तर काही गंभीर जखमींना पुण्याला हलवण्यात आले आहे.

कसा झाला अपघात

सोलापूरहून खासगी ट्रॅव्हलची बस पुण्याकडे येत होती. पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास सर्व प्रवासी झोपेत होते. यावेळी माणगावजवळ बसचे टायर फुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एक ट्रकवर जाऊन आदळली. त्यात बसची एक बाजू पूर्णपणे फाटली आहे. अपघातात चालकही जखमी झाला आहे.

मृतांची संख्या वाढण्याची भीती

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यावेळी स्थानिक नागरिकांनी मदत केली. अपघातात २० जण जखमी झाले आहेत. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Follow Us
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक