Aurangabad : एका गरीब रुग्णाचा तडफडून मृत्यू, औरंगाबादच्या घाटी रुग्णालय परिसरातील घटना

| Updated on: Jul 27, 2022 | 12:25 PM

Ghati Hospital : एका गरीब रुग्णाचा तडफडून मृत्यू

Aurangabad : एका गरीब रुग्णाचा तडफडून मृत्यू, औरंगाबादच्या घाटी रुग्णालय परिसरातील घटना
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबादमधून (Aurangabad) काळीज चिरणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालय (Ghati Hospital) परिसरात एका रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला आहे. घाटी रुग्णालयाच्या दारात असलेल्या धर्मशाळेत रुग्णाचा मृत्यू झालाय. प्रकाश खरात (Prakash Kharat) असं घाटी रुग्णालयाच्या दारात मृत पावलेल्या रुग्णाचं नाव आहे. घाटी रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे रुग्णाचा तडफडून मृत्यू झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मृतदेहाला अपघात विभागात दाखल केलं आहे. मात्र घाटी रुग्णालय प्रशासनाने रुग्णाला जिवंत असताना दुर्लक्ष केल्याचा आरोप लावण्यात येतोय. घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. सरकारी रुग्णालय हे सर्वसामान्य माणसांसाठी असतं. त्याचा लाभ गरीब जनतेला मिळायला हवा. तसं होत नसेल तर असे मृत्यू होतंच राहणार खरात यांच्या मृत्यूला घाटी रुग्णालयाचं प्रशासनच जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक लोक देत आहेत.

रुग्णाचा मृत्यू

औरंगाबादमधून काळीज चिरणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालय परिसरात एका रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला आहे. घाटी रुग्णालयाच्या दारात असलेल्या धर्मशाळेत रुग्णाचा मृत्यू झालाय. प्रकाश खरात असं घाटी रुग्णालयाच्या दारात मृत पावलेल्या रुग्णाचं नाव आहे.

हे सुद्धा वाचा

मृत्यूला रुग्णालय प्रशासन जबाबदार?

घाटी रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे रुग्णाचा तडफडून मृत्यू झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मृतदेहाला अपघात विभागात दाखल केलं आहे. मात्र घाटी रुग्णालय प्रशासनाने रुग्णाला जिवंत असताना दुर्लक्ष केल्याचा आरोप लावण्यात येतोय. घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. सरकारी रुग्णालय हे सर्वसामान्य माणसांसाठी असतं. त्याचा लाभ गरीब जनतेला मिळायला हवा. तसं होत नसेल तर असे मृत्यू होतंच राहणार खरात यांच्या मृत्यूला घाटी रुग्णालयाचं प्रशासनच जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक लोक देत आहेत.