Video: चर्चा तर होणारच…;लग्नासाठी मुंबईतून औरंगाबादेत गेले; लग्नही नाही जेवणही नाही मिळाला तो फक्त मार

| Updated on: Jun 18, 2022 | 4:43 PM

नवरीकडील नातेवाईकांनी नवरीचे लग्न ही त्याच मंडपात आत्याच्या मुलासोबत लावून दिल्यामुळे आता मुंबईकडील नवरदेव व त्यांच्या नातेवाईकांनी नवरी मुलीच्या नातवाईकांवर आरोप केले आहे की, त्यांनी आमची फसवणूक केली आहे.

Video: चर्चा तर होणारच...;लग्नासाठी मुंबईतून औरंगाबादेत गेले; लग्नही नाही जेवणही नाही मिळाला तो फक्त मार
मुंबईच्या वऱ्हाडी मंडळींना औरंगाबादमध्ये मारहाण
Follow us on

मुंबई: सध्याच्या काळातील लग्नं अनेक गोष्टीमुळे चर्चेत राहिली आहेत. कधी नवरीमुलीला हेलिकॉफ्टरमधून फिरवून आणलं म्हणून तर कधी मोठ मोठ्या वरतीमुळे अनेक लग्नं चर्चेचा विषय ठरली आहेत. मुंबईंच्या नवरा (Mumbai Family)आणि औरंगाबादची मुलगी असणारे हे लग्न मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिले आहे तेही अगदी औरंगाबादपासून (Aurangabad) ते मुंबईपर्यंत या एकाच लग्नाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे.

मुंबईमधील विक्रोळी विभागातील नवरदेवाचे वऱ्हाड औरंगाबादमधील गांधेली (Gandheli Fighting) गावात नवरीकडे लग्नसोहळ्यासाठी गेले होते. दोन्हीकडील पाहुण्यांच्या उपस्थित थाटामाटात नवरानवरीवर अक्षताही पडल्या. मात्र काही वेळेतच काही तरी कारण घडले आणि वादाची ठिणगी पडली. नवरदेवाकडील व नवरीकडील नातेवाईक यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि तो इतका विकोपाला गेला की, नवरदेवाकडील आलेल्या वऱ्हाडी मंडळींची गाडीही फोडण्यात आली.

वऱ्हाडी मंडळींवरच दगडफेक

नवरदेवाकडील पाहुण्यांच्या गाडीवरच दगडफेक करून औरंगाबादकर थांबले नाहीत त्यांनी थेट दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीमुळे नवरदेवाकडील 7 ते 8 जण नातेवाईकांना दुखापतही झाली आहे.

आमची फसवणूक…

या घटनेची सर्व माहिती नातेवाईकांनी पोलिसांना देत आपला जीव वाचवत नवरदेवाकडील नातेवाईकांनी थेट मुंबई गाठली. याच दरम्यान नवरीकडील नातेवाईकांनी नवरीचे लग्न ही त्याच मंडपात आत्याच्या मुलासोबत लावून दिल्यामुळे आता मुंबईकडील नवरदेव व त्यांच्या नातेवाईकांनी नवरी मुलीच्या नातवाईकांवर आरोप केले आहे की, त्यांनी आमची फसवणूक केली आहे. आमचा खर्च व नवरीकडे असलेले आमचे दागिने देण्यात यावे. संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही या नातेवाईकांनी केली आहे.

या मारहाणीत नवऱ्याकडील मंडळींतील अनेक नातेवाईक जखमी झाले आहेत. डोक्याला आणि हाता पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे नवऱ्याकडील मंडळींनी आपणाला नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली आहे. या मारहाणीत नातेवाईकांना मारहाण झाली ती झालीच पण वऱ्हाडी मंडळींना घेऊन आलेली खासगी बसही फोडण्यात आली आहे. त्यामुळे याचे नुकसान आता कोण देणार असा सवाल आता मुंबईतील नातेवाईकांनी केला आहे.