Uddhav Thackeray| हातात दंडा घ्या आणि वाकड्या-तिकड्यांना सरळ करा…. औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

| Updated on: Jun 08, 2022 | 11:08 PM

शहरातील पाण्याच्या समस्येवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ' जुनी एक योजना आहे 1972 ची ती गंजून गेलीय. तिच्यासाठीही पैसे देतोय. समांतर जलवाहिनीची भूमिपूजन मी केलं होतं. दुर्दैवानं कोरोनामुळे एक वर्ष गेलं. पण मी केंद्रकरांना सांगितलं आहे की हातात दंडा घ्या आणि आडवा येईल त्याला सरळ करा...

Uddhav Thackeray| हातात दंडा घ्या आणि वाकड्या-तिकड्यांना सरळ करा.... औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः आगामी महापालिका निवडणुका (Municipal Corporation) आणि उन्हाळ्यात उफाळून आलेल्या पाणी प्रश्नावर औरंगाबादमधील राजकीय वातावरण तापलंय. भाजपनं काढलेल्या जलाक्रोश मोर्चानंतर येथील पाणी प्रश्न अधिकच अधोरेखित झाला आहे. त्यामुळे औरंगाबादमधील शिवसेनेच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शहरातील पाणी प्रश्नावर प्रशासन काय काय उपाययोजना करीत आहेत, याविषयी माहिती दिली. तसेच स्थानिक अधिकारी आणि मनपा प्रशासनालाही याबाबत कठोर सूचना केल्या. नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी मी एक पैसाही कमी पडू देणार नाही. पण या योजनांमध्ये जे कुणी आडकाठी करतंय, त्यांना सोडू नका, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी दिल्या. औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे यांचं आगमन झाल्यावर मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) आणि विभागीय आय़ुक्ता सुनिल केंद्रेकर यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी त्यांना सूचना केल्या.

पाणी प्रश्नावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शहरातील पाण्याच्या समस्येवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ जुनी एक योजना आहे 1972 ची ती गंजून गेलीय. तिच्यासाठीही पैसे देतोय. समांतर जलवाहिनीची भूमिपूजन मी केलं होतं. दुर्दैवानं कोरोनामुळे एक वर्ष गेलं. पण मी केंद्रकरांना सांगितलं आहे की हातात दंडा घ्या आणि आडवा येईल त्याला सरळ करा… पण आता किंमती वाढल्या आहेत… पण मी एक पैसा त्या योजनेला कमी पडू देणार नाही. कंत्राटदार काम करत नसेल तर त्याला तुंरुंगात टाकण्याचे आदेश मी दिले आहेत..’

‘आक्रोश सत्ता गेली म्हणून होता’

भाजपच्या जलाक्रोश मोर्चावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ कुणीतरी आक्रोश मोर्चा काढला… तो आक्रोश त्यांचा सत्ता गेली होती म्हणून होता पाण्यासाठी नव्हता. मागचे पाच वर्षे तुम्हीच होता. आम्ही फक्त त्यांच्यासोबत होतो. खोटं बोलणं हे आम्हाला शिकवलेलं नाही. रस्त्यासाठी आम्ही निधी दिला आहे. तीन चार वर्षापूर्वी संभाजीनगरचे रस्ते कसे होते. अजूनही पूर्ण काम झालेलं नाही. पण सुधारणा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केला. अगदी मेट्रोची गरज लागली तर त्यासाठी प्लान बनवण्याची सुरुवात केली आहे. मेट्रो शहराची विद्रुपीकरण करणारी नसेल. विध्वसंक विकासकाम आम्ही केलेलं नाही आणि होऊ देणार नाही. संभाजीनगरची शान जाईल असं मी काही करणार नाही.’

‘आधी काम करेन, मग संभाजीनगर करेन’

औरंगाबादच्या नामांतराबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ संभाजीनगर कधी करणार? हे त्यांनी सांगायचं का आपल्याला. माझ्या वडिलांनी शिवसेनाप्रमुखांनी वचन दिलं आहे. ते मी कधी विसरणार नाही. पण विचारणाऱ्यांना मला सांगायचं आहे. एक सुरुवात म्हणून विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीराजे करा असा प्रस्ताव मी दिला आहे. तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर या शहराचं नामांतर नाही तर छत्रपती संभाजीराजेंना आदर्श वाटेल असं शहर मी करणार आहे. नाव बदलून चालणार नाही… नावं दिलं आणि पाणी नसेल, नाव दिलं आणि रस्ते नसतील तर संभाजीराजे म्हणतील चल तुला रायगडावरील टकमकटोक दाखवतो….विमानतळाचं नाव संभाजीराजेंच्या नावाने द्या आम्ही तुमचा सत्कार करतो…’