Cm Uddhav Thackeray : भाजपाच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर ही वेळ, पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर का? नुपूर शर्मांवरून मुख्यमंत्र्यांचा सवाल

भाजपच्या तिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढावली ते तुम्हाला मान्य आहे का? अशा थेट सवाल त्यांनी केला आहे. तसेच अशा पद्धतीने तुम्ही जाणार असाल आणि आम्ही तुमच्या मागे फरफटत यावं हे होणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला बजावलं आहे. 

Cm Uddhav Thackeray : भाजपाच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर ही वेळ, पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर का? नुपूर शर्मांवरून मुख्यमंत्र्यांचा सवाल
भाजपाच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर ही वेळImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 9:29 PM

औरंगाबाद : रोज शिवसेनेवर टीका करणारे भाजप नेते आणि प्रवक्ते हे तर आज मुख्यमंत्र्यांचं ठरलेलं (Cm Uddhav Thackeray) टार्गेट होतं. त्यांनी औरंगाबादेतल्या स्टेजवरून भाजप प्रवक्त्यांना इशारा तर दिला आहे. मात्र मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्यावरूनही भाजपला काही खोचक सवाल केले आहेत. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, भाजपच्या कोणत्या प्रवक्त्याने प्रेषितांचा अपमान केल्यानंतर अरब राष्ट्रांनी आपल्याला गुडघ्यावर आणलं. देशानं काय केलं आहे, देशानं का माफी मागायची…? असा सवाल त्यांनी केला आहे. भाजपचा प्रवक्ता म्हणजे (BJP Spokeperson) देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी फटकारलं आहे, तर तुम्ही तुमच्या भूमिकेनं जा पुढे… आज मी तुम्हाला जाहीरपणे विचारतो ज्या भाजपच्या तिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढावली ते तुम्हाला मान्य आहे का? अशा थेट सवाल त्यांनी केला आहे. तसेच अशा पद्धतीने तुम्ही जाणार असाल आणि आम्ही तुमच्या मागे फरफटत यावं हे होणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला बजावलं आहे.

काश्मिरी पंडितांना मी आसरा देणार

तर अनेक गुंतवणूकदार येत आहेत. पण ते येऊ नये म्हणून भाजप आक्रोश करतोय. हे कमी पडतंय म्हणून की काय कुण्याच्या मागे ईडी लाव, सीबीआय लाव… इकडे ईडी, सीबीआय लावण्यापेक्षा तिकडे काश्मिरमध्ये जा. संताप कुठे येतो, चिड कुठे येते जेव्हा काश्मिरमध्ये काश्मिरी पंडित बाहेर पडत आहेत. तेव्हा कुणी मायचा पुत भाजपचा प्रवक्ता बोलत नाही. पण शिवसेनाप्रमुखांचा पुत्र, महाराष्ट्राचा मुलगा म्हणून मी जबाबदारी स्वीकारतोय. त्यांना महाराष्ट्रात आसरा देणार. मला आठवत आहेत ते दिवस कुठेही दहशतवादी हल्ला झाला की भाजप, शिवसेना रस्त्यावर उतरत होती, बंद, संप करत होतो… पण आज बंद नाही, महागाई वाढली तरी संप नाही. भाजपमध्ये बंद करण्याची ताकद नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला डिवचलं आहे.

धर्माच्या नावाने अंगावर याल तर सोडणार नाही

दरम्यान या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटलं आहे,  शिवसेनाप्रमुखांनी मुसलमानांचा मुसलमान द्वेष करा असं कधीही सांगितलं नाही असे सांगतानाच मुख्यमंत्री म्हणाले, शिवाजी महाराजांनीही अन्य धर्माचा आदर केला आहे. बाळासाहेबांनीही हा देश हाच माझा धर्म म्हणून बाहेर पडण्यास सांगितलं. पण धर्माच्या नावाने आमच्या अंगावर कुणी आला तर सोलल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी भाजपला देऊन टाकला आहे.

Non Stop LIVE Update
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.