AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : पती, पत्नीचे सतत भांडणं होतायेत? मग घरात लावा या पक्ष्याचा फोटो, सर्व समस्या होतील दूर

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये विविध समस्यांवर उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा आपण पहातो की घरात शांती नसते, पती-पत्नीचं पटत नाही, घर नेहमी अशांत राहातं. त्यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : पती, पत्नीचे सतत भांडणं होतायेत? मग घरात लावा या पक्ष्याचा फोटो, सर्व समस्या होतील दूर
LOVE BIRDSImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 13, 2026 | 8:39 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं, प्राणी आणि पक्षी यांना शुभ मानलं गेलं आहे. या झाडांचा, प्राण्यांचा आणि पक्ष्याचा फोटो घरात लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. वास्तुशास्त्रानुसार काही मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं हे अतिशय शुभ असतं. यामुळे घराची आर्थिक प्रगती होते, कुटुंबप्रमुखाला प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतात. तसेच घरात काही कारणांमुळे जर वाद विवाद सुरू असतील तर ही स्थिती दूर होऊन घरात शांतता राहते, घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. नकारात्मक ऊर्जा दूर होते, जसं की वास्तुशास्त्रामध्ये तुळशीचं झाडं हे अतिश्य शुभ मानण्यात आलं आहे. तर दुसरीकडे काही फोटो किंवा मूर्ती अशाही असतात ज्या वास्तुशास्त्रामध्ये अशुभ माण्यात आल्या आहेत, जर हे फोटो घरात लावले तर त्यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात, घरात काहीही कारण नसताना वादविवाद सुरू होतात, घर अशांत बनते. आज आपण अशा दोन फोटोंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांना वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. या फोटोंमुळे दाम्पत्य जीवनात प्रेम वाढून, पती-पत्नीमधील वाद दूर होतात. तसेच घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते.

लव्ह बर्ड – लव्ह बर्डचा फोटो हा वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानला गेला आहे. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास काहीही कारण नसताना अनेकदा पती-पत्नीमध्ये वाद होतात. सतत सुरू असलेल्या भांडणामुळे घर अशांत बनते. त्याचा परिणाम हा त्या घरातील सर्व सदस्यांवर होतो. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत सोपा उपाय सांगण्यात आला आहे. जर पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होत असतील तर तुमच्या घराच्या बेडरूममध्ये लव्ह बर्डचा फोटो लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. लव्ह बर्डचा फोटो लावताना फक्त एक काळजी घ्यावी ती म्हणजे हा फोटो पूर्व, पश्चिम किंवा उत्तर अशा कोणत्याही दिशेला लावला तरी चालतो, मात्र दक्षिण दिशेला हा फोटो असू नये.

फिनिक्स पक्षी – हा पक्षी पूर्णपणे काल्पनिक आहे. मात्र तरी देखील या पक्ष्याला धन, धान्य संपत्ती आणि समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. जर घरात काही आर्थिक समस्या सुरू असतील तर या पक्ष्याचा फोटो हा आपल्या घरात लावण्याचा सल्ला वास्त्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. या फोटोमुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, त्याची जागा सकारात्मक ऊर्जा घेते. प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...