Weather Alert | मराठवाड्याचा पारा 41 अंशांपुढे, उस्मानाबादेत उष्माघाताचा पहिला बळी, हिंगोलीत स्वतंत्र कक्ष !

| Updated on: Apr 01, 2022 | 10:30 AM

राज्यात उष्णतेची लाट सुरु असून मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांचे तापमान वाढलेले आहे. औरंगाबादसह, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील तापमान चाळीशीपर्यंत किंवा चाळीशीपार पोहोचले आहे.

Weather Alert | मराठवाड्याचा पारा 41 अंशांपुढे, उस्मानाबादेत उष्माघाताचा पहिला बळी, हिंगोलीत स्वतंत्र कक्ष !
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबाद | राज्यात उष्णतेची लाट (Heat wave) सुरु असून मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांचे तापमान वाढलेले आहे. औरंगाबादसह, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील तापमान चाळीशीपर्यंत किंवा चाळीशीपार पोहोचले आहे. तसेच पुढील तीन दिवस उन्हाचा (Temperature) तडाखा कायम राहून काही अंशी तापमानात वाढ संभवू शकते, अशा इशारा हवामान खात्याने दिला आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad) मार्च महिन्यातही उष्णतेची लाट आली होती. तेव्हादेखील सकाळी 9 वाजताच तापमानाचा पारा 40 पर्यंत पोहोचलेला असायचा. आता मार्च अखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीलाही पुन्हा एकदा शहरातील तापमान 41ते 42 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. राजस्थान तसेच गुजरातकडून वाहणाऱ्या अतिउष्ण तसेच कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील उष्णतेच्या लाटेचा मुक्काम 2 एप्रिलपर्यंत राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतरही काही दिवस तापमानातील वाढ कायम राहिल, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे, तसेच शेतकऱ्यांनी जनावरांना सावलीत बांधावे,नवीन लागवड केलेल्या फळ झाडांना सावली, अच्छादन करावे, असे आवाहन मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मौसम सेवा केंद्रातील प्रमुख प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी केले आहे.

उस्मानाबादेत उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू

उस्मानाबाद जिल्ह्यात उष्माघातामुळे या वर्षातील पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे. काल जिल्ह्यातील लिंबराज सुकाळे या 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने त्याने घाई-घाईत पाणी प्यायले. त्यानंतर त्याला उष्माघाताचा झटका आला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना तत्काळ उपचारासाठी कळंब येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. येत्या तीन दिवसात मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असल्याने शेतकरी आणि अन्य नागरिकांनी थेट उन्हात जाणे टाळावे, तसेच आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंगोलीत उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष

हिंगोली जिल्ह्याचे तापमानही मार्च महिन्यापासून वाढलेलेच आहे. उष्णेत्या लाटेमुळे शारीरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करून मुबलक औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच कक्षात पाच बेड तसेच कूलर ठेवण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील तापमानाचा पारादेखील 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. दुपारी 12 वाजता उष्णतेचा जास्त त्रास जाणवत आहे. मे महिन्यात हे तापमान 43 ते 44 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या-

Zodiac | ”सुख म्हणजे नक्की हेच असतं” असंच म्हणाल, ग्रहांची स्थिती बदलणार, 3 राशींचे नशीब बदलून जाणार

मधुमेही आहात ? तर मग या पाच फळांपासून नेहमी लांब राहा