मधुमेही आहात ? तर मग या पाच फळांपासून नेहमी लांब राहा

निरोगी व्यक्तींच्या शरीराला विविध फळांपासून अनेक फायदे मिळत असतात. सध्या उन्हाळा सुरु असल्याने शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी फळांचे सेवन महत्वपूर्ण मानले जात असते. या दिवसांमध्ये टरबूजाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. परंतु जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर, हेच फळं तुमच्यासाठी डोकेदुखील ठरु शकतात.

मधुमेही आहात ? तर मग या पाच फळांपासून नेहमी लांब राहा
मधुमेही आहात?Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 10:05 AM

तुम्ही अत्यंत निरोगी आहात, नियमित व्यायाम करीत आहात, तुमचे शरीर अत्यंत तंदुरुस्त आहे, असे असल्यास फळे तुम्हाला एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत. शरीरासाठी फळे (fruits) अतिशय महत्वपूर्ण ठरत असतात. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असल्याने या दिवसांमध्ये जेवण कमी होत असते. अशा वेळी तुम्ही फळांव्दारे स्वत:ला हायड्रेड ठेवू शकतात. हे झाले निरोगी व्यक्तीबाबत… परंतु तुम्हाला साखरेची (sugar) समस्या असेल, तुम्ही मधुमेही (diabetic) असाल तर मात्र तुम्ही काही फळांपासून लांब राहणेच योग्य असते. कारण या फळांमधील साखर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढवू शकते. त्यामुळे हे फळे तुमची मधुमेहाची समस्या अधिक वाढवू शकतात. यात प्राकृतिक पध्दतीची साखर असल्याने याचा शरीरावर दुष्परिणाम होउ शकतो.

टरबूज

उन्हाळ्यात टरबुजाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. साधारणत: 100 ग्रॅम टरबुजमध्ये 30 कॅलरी असतात. तर 0.4 ग्रॅम डाईटरी फायबरचे प्रमाण असते. यात कॅलरी जास्त नसल्या तरी यात प्राकृतिक पध्दतीची साखर असते. 100 ग्रॅम टरबूजमध्ये सारधात: 6.2 ग्रॅम साखरेचे प्रमाण असते. शरीराला रोज फक्त 5 ग्रॅम साखरेची आवश्‍यकता असते. आपण दिवसाला साधारणत: एक वाटीदेखील टरबूज खाल्ले तरी त्यातून 12 ग्रॅम साखर शरीराला मिळते. व ही मधुमेहींसाठी घातक ठरु शकते. त्यामुळे साखरेचा त्रास असलेल्यांनी टरबूजपासून लांबच रहावे.

केळी

मधुमेहींसाठी केळी अत्यंत घातक आहे. केळीमध्ये प्राकृतिक पध्दतीने मोठ्या प्रमाणात साखर असते. साधारणत: 100 ग्रॅम केळीत 12.23 ग्रॅम इतक्या मोठ्या प्रमाणात साखर असते. शिवाय केळीचा ग्लाईसेमिक इंडेक्सदेखील 51 च्या घरात आहे. त्यामुळे मधुमेहींनी केळीपासून लांब रहावे.

द्राक्ष

द्राक्षांमध्येही मोठ्या प्रमाणात साखर असते. साधारणत: 100 ग्रॅम द्राक्षांमध्ये 15.48 ग्रॅम इतक्या मोठ्या प्रमाणात साखर असते. त्यामुळे मधुमेही लोकांसाठी द्राक्ष घातक ठरु शकतात. द्राक्षांचा ग्लाईसेमिक इंडेक्सदेखील 53 इतका आहे. द्राक्ष खाल्ल्यानंतर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण अत्यंत वेगाने वाढत असते.

आंबा

100 ग्रॅम साखरेत 13.7 ग्रॅम साखरेचे प्रमाण असते. ग्लाईसेमिक इंडेक्सदेखील 51 च्या घरात आहे. त्यामुळे मधुमेही लोकांसाठी आंबा हा घातक समजला जातो.

चिकू

100 ग्रॅम चिकुमध्ये तब्बल 20.14 ग्रॅम साखरेचे प्रमाण असते. हे सर्वाधिक प्रमाण मधुमेहींच्या आरोग्यासाठी चांगले नाही. ग्लाईसेमिक इंडेक्सदेखील 53 इतका आहे. त्यामुळे हे फळदेखील मधुमेहींना टाळायला हवे.

व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ, हॉटेलमधील जेवन महागणार?

Aurangabad | शहरातल्या रस्त्यांसाठी 200 कोटींची तरतूद, तीन संशोधन केंद्र, महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 10 मुद्दे

IPL 2022 points table मध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.