No Mask In Maharashtra : महाराष्ट्रातले कोरोना निर्बंध हटवले म्हणजे नेमकं काय काय झालं? 10 गोष्टी लक्षात असू द्या

No Mask In Maharashtra : महाराष्ट्रातले कोरोना निर्बंध हटवले म्हणजे नेमकं काय काय झालं? 10 गोष्टी लक्षात असू द्या
महाराष्ट्र राज्य सरकारनं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेतला आहे.
Image Credit source: TV9

Maharashtra No Covid Restrictions News : महाराष्ट्र राज्य सरकारनं राज्याला कोविड निर्बंध मुक्त करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या बैठकीत कोरोना निर्बंधांच्या अनुशंगानं घेतल्या गेलेल्या निर्णयांचा अन्वयार्थ काय आहे, ते समजून घेऊयात...

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Mar 31, 2022 | 6:30 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारनं कोरोना निर्बंध (Maharashtra No Corona) हटवण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेतला. या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर अखेर राज्य कोविड निर्बंध मुक्त (Restricted) झालं आहे. या निर्णयानं राज्यातील जनतेला दिलासा जरी मिळालेला असला, तरिही काही गोष्टी काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. मास्कमुक्त (Mask-free), कोविडनिर्बंधमुक्त, यासोबत कोरोनाबाबतचे महत्त्वाचे निर्णय आणि त्यांचा अन्वयार्थ महत्त्वाच्या पाच सोप्या मुद्द्यामधून समजून घेऊयात…

  1. आता मास्क वापरणं बंधनकारक नाही. ते ऐच्छिक असेल. म्हणजेच एखाद्यानं आता मास्क वापरला नाही तर त्याला पोलीस किंवा इतर कुठलीही प्रशासकिय यंत्रणा दंड ठोठावू शकणार नाही. मास्क फ्री महाराष्ट्र म्हणजे दंड फ्री महाराष्ट्र असेल.
  2. मास्क फ्री महाराष्ट्र कायदेशीरपणे जाहीर केला असला तरीसुद्धा तो ऐच्छिक ठेवलाय. म्हणजेच मास्क फक्त तुम्हाला कोविडपासूनच वाचवतो असं नाही तर इतर आजारांपासूनही संरक्षण देतो. कोविडचं संकट पूर्णपणे हटलंय असं म्हणता येत नाही. चीनमधे अजूनही शांघायसारखी शहरं लॉकडाऊन होतायत. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मास्कमुक्ती जाहीर केली असेल तरीसुद्धा मास्क वापराल तर फायदाच होईल.
  3. उन्हाळा सुरु झालाय. खरं तर आपल्याकडे हा काळ सण उत्सवांचा मानला जातो. कारण हिवाळ्यानंतरच ठिकठिकाणच्या जत्रा-यात्रांची चाहुल लागते. एप्रिल महिन्यात तर गुढीपाडवा, बाबासाहेबांची जयंती आणि रमजानचा पवित्र महिना असे तीन मोठे दिवस आहेत. त्या आता मुक्तपणे साजरे करता येतील. ना गर्दीवर बंधनं असतील ना ती साजरी करताना. त्यामुळे कोविडच्या नावाखाली तुम्हाला कुणी हटकू शकणार नाही. पण तरीही काळजी घ्या.
  4. कोविडच्या काळात लग्न आणि इतर समारंभासाठी मोठी बंधनं होती. पाहुण्यांच्या संख्येवर मर्यादा होती. आता कोविडचे सर्व बंधनं हटवली आहेत, त्यामुळे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच तुम्ही हवे तेवढे पाहुणे, मित्रं बोलावू शकता. आनंदानं साजरा करु शकता.
  5. कोरोनाच्या काळात काटकसरीची सवय लागलीय, ती चांगली गोष्ट आहे. नियम, बंधनं हटवली म्हणजे आनंद साजरा करावा पण वारेमाप उधळपट्टी नको. संपत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन टाळा. ज्यांची ऐपत नाही, त्यांची मोठी कुचंबना होते. त्यामुळे सरकारनं जरी बंधनं हटवली असले तरीसुद्धा ज्या काही चांगल्या चार गोष्टींची सवय लागलीय ती नक्की जपा. कारण काळ कधी कठिण होईल सांगता येत नाही. कोरोनाचा तोच धडा लक्षात ठेवा.
  6. हॉटेल, मॉल किंवा इतर अशा ठिकाणी जाताना दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्रं सर्रास विचारलं जायचं. आता ते विचारलं जाणार नाही. यात सिनेमागृह सुद्धा आली. कधी कधी ते प्रमाणपत्रं नसायचं. पण आता निर्बंध उठवल्यामुळे यातूनही सुटका असेल. याचा अर्थ असा नाही की लगेचच ते प्रमाणपत्रं मोबाईलमधून डिलिट करावं. ते वापरणे सहज शक्य असेल तर ते नक्की ठेवा.
  7. ज्यांनी दोन डोस घेतले होते त्यांनाच लोकल प्रवासाची मुभा होती. मुंबईत ही अट तंतोतंत पाळली जायची. ज्या प्रवाशांनी अशी लस घेतली नसेल त्यांना टीसी पकडून दंड वसूल करत. आता त्यातून मुक्तता होईल. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही लसच घेऊ नये. ती जेवढ्या लवकर घेता येईल तेवढ्या लवकर घ्या. म्हणजे सगळ्याच गोष्टी कायद्यानं पार पाडाव्यात असं नाही. लस हेच कोरोनाविरुद्धचं कवच असल्याचं पुन्हा पु्न्हा सिद्ध झालंय.
  8. कोविडवरच्या निर्बंधामुळे शाळा, परिक्षा, विद्यापीठं अशा सगळ्या ठिकाणी अनेक अडचणी यायच्या. आता निर्बंध हटल्यामुळे त्या कमी होतील अशी अपेक्षा आहे. शाळा, कॉलेज पूर्ण क्षमतेनं कार्यरत होतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. कोविड निर्बंधामुळे प्रशासनातही, दोन वेगवेगळ्या मंत्रालयातही गोंधळ उडायचा. तो आता कमी होईल अशी शक्यता.
  9. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबादसह मोठ्या शहरात हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट अशा ठिकाणी निर्बंध होते. ते बंद करण्यासाठीही वेळेची मर्यादा होती. आता नियम हटवल्यामुळे रेग्युलर टाईमला बंद करता येतील.
  10. कोरोना निर्बंधामुळे खासगी कंपन्या तसच सरकारी कार्यालयेही आता पूर्ण क्षमतेनं सुरु रहातील. दांडी मारायला कारण सापडणार नाही किंवा सरकारी आजारीपणही देता येणार नाही. त्यामुळे हे निर्बंध हटवल्यानं तुमचं रोजचं प्रशासकिय कामही वेगानं होईल अशी शक्यता-अपेक्षा.

संबंधित बातम्या

Breaking News: कामावर रुजू न झालेल्यांवर उद्यापासून कारवाई! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परब यांनी ठणकावलं

गडचिरोलीमध्ये भरधाव ट्रकची शाळेच्या बसला धडक, 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

Lonikar Audio Clip : लोणीकरांच्या ऑडीओ क्लिपचे मुंबई ते औरंगाबाद पडसाद, काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोणीकरांच्या घरावर शेण फेकलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें