AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निळ्या ड्रममध्ये कोंबला वडिलांचा मृतदेह, हत्येचे कारण ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 19 वर्षीय मुलाने वडिलांची हत्या करुन त्यांचा मृतदेह ड्रममध्ये कोंबला आहे. आता नेमकं काय झालं होतं जाणून घ्या प्रकरण...

निळ्या ड्रममध्ये कोंबला वडिलांचा मृतदेह, हत्येचे कारण ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
Akshat Pratap SinghImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 24, 2026 | 2:22 PM
Share

उत्तर प्रदेशच्या मेरठमधील मुस्कान रस्तोगीने पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह एका निळ्या ड्रममध्ये ठेवला होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने त्यावर सिमेंट आणि विटांनी बांधकाम केले. आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका मुलाने आपल्या वडिलांची हत्या करुन त्यांचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरला होता. जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा हत्येचे कारण ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

लखनऊच्या आशियाना परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे १९-२१ वर्षांच्या मुलाने आपल्या वडिलांची लायसन्स्ड रायफलने हत्या केली आणि ओळख लपवण्यासाठी मृतदेहासोबत जे केले, ते ऐकून संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या संपूर्ण घटनेच्या केंद्रस्थानी आहे २१ वर्षीय अक्षत प्रताप सिंह, ज्याचा स्वभाव लहानपणापासूनच हट्टी आणि बंडखोर होता. शेजाऱ्यांच्या मते, अक्षतची आई लहानपणीच निधन पावली होती, त्यानंतर तो अत्यंत हट्टी, जिद्दी आणि विद्रोही स्वभावाचा झाला. 4 वर्षांपूर्वीही त्याने नाराजी व्यक्त करत एक चिठ्ठी लिहून घर सोडले होते.

अक्षतचे मन अभ्यासात अजिबात लागत नव्हते. त्याचे वडील मानवेंद्र सिंह (जे दारू आणि पॅथॉलॉजी लॅबचे मोठे व्यावसायिक होते) यांना मुलाने मेडिकलची पदवी घेऊन व्यवसाय सांभाळावा असे वाटत होते. या करिअर आणि अभ्यासाच्या दबावामुळे अक्षतच्या मनात इतकी तीव्र घृणा निर्माण झाली की, त्याने आपल्या वडिलांना मार्गातून हटवण्याचा कट रचला.

प्रथम गोळी झाडली, नंतर मृतदेहाचे तुकडे केले

डीसीपी सेंट्रल विक्रांत वीर यांच्या मते, ही घटना २० फेब्रुवारीच्या सकाळची आहे. पोलिसांच्या चौकशीत अक्षतने गुन्हा कबूल केला की, त्याने वडिलांच्या डोक्यात लायसन्स्ड रायफलने गोळी मारून हत्या केली. हत्येनंतर त्याने मृतदेहाला ओढत घराच्या ग्राउंड फ्लोअरवर नेले, जेथे कोणी राहत नव्हते.

बाजारातून सुरा खरेदी करून आणली

सुरुवातीला त्याने मृतदेह कारमध्ये भरून गोमती नदीत फेकण्याचा विचार केला, पण वजन जास्त असल्याने तो अपयशी ठरला. त्यानंतर त्याने बाजारातून सुरा खरेदी केला आणि वडिलांच्या मृतदेहाला क्रूरपणे कापले. त्याने हात, पाय आणि डोके कापून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले, तर धडाला स्लीपिंग बॅगेत भरून नीळ्या ड्रममध्ये लपवले.

गुन्हेगारी आणि सुसाइडची खोटी कथा

अक्षतने पोलिसांना फसवण्यासाठी २० फेब्रुवारीलाच वडिलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घरातील सदस्यांची बारकाईने चौकशी सुरू केली तेव्हा अक्षतच्या जबानीत विरोधाभास आढळला. सुरुवातीला त्याने हे सुसाइड असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी कडक कारवाई केल्यावर त्याने सगळे सत्य उघड केले.

सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन.
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह.
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास!
मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास!.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करा! वडेट्टीवार यांची मागणी
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करा! वडेट्टीवार यांची मागणी.
शरद पवार यांना रुग्णालयातून उद्या डिस्चार्ज
शरद पवार यांना रुग्णालयातून उद्या डिस्चार्ज.
उत्तम मुख्यमंत्री झाले असते म्हणणारेच दादांना तुरुंगात टाकणार होते
उत्तम मुख्यमंत्री झाले असते म्हणणारेच दादांना तुरुंगात टाकणार होते.
पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार?
पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार?.
आता धर्मदाय रुग्णालयांसाठी नवीन नियम! फडणवीसांनी दिली माहिती
आता धर्मदाय रुग्णालयांसाठी नवीन नियम! फडणवीसांनी दिली माहिती.
झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांचे आंदोलन
झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांचे आंदोलन.