AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत? थेट पवार कुटुंबातूनच तो मोठा दावा, भाजपच्या अडचणी वाढल्या?

Sunetra Pawar Become Chief Minister?: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कुटुंबिय सध्या पोटनिडवणुकीत व्यग्र असतानाच त्यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी राष्ट्रवादीतून जोर पकडू लागली आहे. तशी भावनिक साद यापूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी घातली. आता तर थेट पवार कुटुंबातूनच हा मोठा दावा करण्यात येत आहे.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत? थेट पवार कुटुंबातूनच तो मोठा दावा, भाजपच्या अडचणी वाढल्या?
सुनेत्रा पवार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत?Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 16, 2026 | 1:49 PM
Share

Jay Pawar-Yugendra Pawar-Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या बारामती पोटनिवडणुकीत व्यग्र आहेत. त्यात प्रचारात आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील बडे नेते हे त्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी मागणी करत आहेत. मंत्री आदिती तटकरे यांनी तर तीन दिवसांपूर्वीच अशी भावनिक साद घातली आणि आता पवार कुटुंबातील दोन सदस्यांनी या मागणीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत का? असा सवाल विचारला जात आहे.

पवार कुटुंबिय प्रचारात

लोकांच्या भावना अजून देखील दादांच्या जाण्याने दु:ख मनात आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा आम्हाला वाटत होतं. परंतु झाली नाही म्हणून आम्ही प्रचार करीत आहोत. लोकांच्या समस्या जाणून त्या समस्या सोडवण्यासाठी मी जाणून घेतोय आणि त्या वहिनी पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. रोहित पवार यांनी त्यांचे दौरे आखलेले आहेत आणि आम्ही आमचे दौर्‍यातून प्रचार करीत आहोत. युगेंद्र पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि आम्ही दादांसाठी आणि वहिनी साठी प्रचार करतोय हे आमचं भाग्य आहे, असे अजितदादांचे चिरंजीव जय पवार म्हणाले.

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर आनंद

विलीनीकरणावर मी भाष्य करणार नाही ही चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं राज्यासाठी योगदान मोठं होतं यासाठी भारतीय जनता पार्टी मधील नेते प्रचार करत असतील तर ही बाब चांगली आहे. उमेदवार सुनेत्रा पवार यांना दोन लाखापेक्षा जास्त लीड मिळेल. सर्वांना वाटत होतं की दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, सुनेत्रा वहिनी पवार मुख्यमंत्री ही आशा संपूर्ण करू शकल्या तर सर्वांनाच आनंद होईल, असे मत जय पवार यांनी मांडले.

सुनेत्रा पवार यांना दोन लाखांची लीड

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडून तर येणारच आहेत. परंतु दोन लाखांच्या पेक्षा जास्त लीडने निवडून येणार आहेत. काँग्रेसने देखील या निवडणुकीतून माघार घेतली आहे. शरद पवार हे मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी बोलले. पवार साहेबांच्या शब्दाला मान देऊन मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचा उमेदवाराचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला. आम्ही लहानपणापासून एकत्र प्रचार करीत आहोत जय पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि मी भावंड आहोत. आमचे पक्ष काही काळापूर्वी वेगळे झाले होते ते एकत्र देखील येणार होते दुर्दैवाने ते झाले नाही.ॉजय पवार रोहित पवार पार्थ पवार आणि मी एकत्र येऊन प्रचार करणार आहोत, असे युगेंद्र पवार म्हणाले.

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होत असतील तर स्वागतच

अजितदादा असताना भाजपचे नेते कधी बारामती येत नव्हते, आले तरी खूप कमी प्रमाणात यायचे, लोकसभेला देखील भाजपचं कुणीही बारामतीत आलं नव्हतं. भाजपचे नेते बारामती प्रचाराला येत आहेत त्यांचा काहीतरी हेतू असावा भाजपचं स्वप्न राहिलं आहे की बारामतीचा लोकसभेला खासदार, विधानसभेला आमदार असावा, असे युगेंद्र पवार म्हणाले. भाजप जर सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री करीत असेल तर त्याचं स्वागतच आहे. आमच्या पक्षाकडून त्यांना शुभेच्छा देखील आहेत. दादांच्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सरकार कमी पडत आहे, अशी टीका युगेंद्र पवार यांनी केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...