Amaravati | अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडोझर अन्…
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या मुख्य आरोपीला अटक केली असून, आता पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं दिसत आहे.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या मुख्य आरोपीला अटक केली असून, या प्रकरणामागे मोठे जाळे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली असून यावरुन पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं दिसत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आतापर्यंत किमान सात तरुणींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ पुरावे हाती लागले आहेत. मात्र, प्राथमिक तपासात हा आकडा अधिक मोठा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून 180 पेक्षा अधिक तरुणींचे शोषण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील पीडित तरुणी या परतवाडा, अमरावती आणि नागपूर परिसरातील असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपी तनवीर हा MIM पक्षाशी संबंधित कार्यकर्ता असल्याची माहितीही पुढे आली आहे. या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. संबंधित आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे.
Published on: Apr 15, 2026 06:34 PM
सावधान! मोठ्या Gold Scam चा पर्दाफाश, सोनाराकडून भयंकर कांड, 133 जणांन
लाडकी बहीण योजनेतून नाव वगळलं? बावनकुळेंनी दिली मोठी गुड न्यूज!
अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष भविष्यात राहणार नाही; संजय राऊतांचे मोठ
मातोश्रीवर बैठक, पण उमेदवारी अर्जच गायब; ठाकरे गटात नेमकं काय चाललंय?

