Deepak Londhe | भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून… बड्या नेत्यांचीही चौकशी होणार?
सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणात अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. नुकतेच दीपक केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे हे शिर्डी पोलिसात दाखल झाले असून गेल्या अर्ध्या तासापासून त्यांची चौकशी सुरू आहे.
सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणात अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. अनेकांचे फोटोदेखील व्हायरल झाले होते. या संदर्भात पोलीस तपास जलद गतीने होत असून अनेकांची चौकशी सुरू आहे. नुकतेच दीपक केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे हे शिर्डी पोलिसात दाखल झाले असून गेल्या अर्ध्या तासापासून त्यांची चौकशी सुरू आहे.
शिर्डीतील जमीन विक्री आणि समता पतसंस्थेतील खात्यांबाबत तसेच इतर व्यवहारांबाबत चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. अलीकडेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच सुषमा अंधारे यांनी दीपक केसरकर आणि दीपक लोंढे यांच्यावर खरात प्रकरणी गंभीर आरोप केले होते. चौकशीत नेमकं काय घडणार? कोणती मोठी माहिती समोर येईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा...
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच...
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर

