AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत; 180 हून अधिक तरुणींच्या शोषणाचा संशय

tv9 Marathi Special Report | परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत; 180 हून अधिक तरुणींच्या शोषणाचा संशय

| Updated on: Apr 15, 2026 | 5:43 PM
Share

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या मुख्य आरोपीला अटक केली असून, या प्रकरणामागे मोठे जाळे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या मुख्य आरोपीला अटक केली असून, या प्रकरणामागे मोठे जाळे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आतापर्यंत किमान सात तरुणींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ पुरावे हाती लागले आहेत. मात्र, प्राथमिक तपासात हा आकडा अधिक मोठा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून १८० पेक्षा अधिक तरुणींचे शोषण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील पीडित तरुणी या परतवाडा, अमरावती आणि नागपूर परिसरातील असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपी तनवीर हा MIM पक्षाशी संबंधित कार्यकर्ता असल्याची माहितीही पुढे आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, आरोपीने डिलीट केलेला डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी सायबर विभागाकडून तपास सुरू असून, पुढील चौकशीत आणखी पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे राज्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Published on: Apr 15, 2026 05:43 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या