AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार?

पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार?

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Feb 24, 2026 | 12:16 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २६ तारखेला वरळी डोममध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेचे उमेदवार असतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर निर्णय झाल्याचे समजते. ही बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.

येत्या २६ तारखेला वरळी डोममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीतही पार्थ पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली आणि त्यांच्या नावावर एकमताने सहमती झाल्याचे कळते. पार्थ पवार राज्यसभेच्या जागेसाठी सातत्याने आग्रही होते आणि आता त्यांना ही संधी मिळणार असल्याचे चित्र आहे.

Published on: Feb 24, 2026 12:16 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या