PHOTO: औरंगाबादेत पावसाचा हाहाकार, रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे, घरात-दुकानात पाणी शिरल्याने नागरिक हैराण

| Updated on: Oct 02, 2021 | 11:28 AM

1 / 5
आंबेडकर नगर ते पिसादेवी पुलावर मुसधार पडलेल्या पावसामुळे पाणी आले आहे. तरीही नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. पिसादेवी - आंबेडकर चौक तसेच पिसादेवी- गोपाळपूर मार्गे नारेगाव- सिटी हे दोन्ही रस्ते पूरस्थिती उद्भवल्यामुळे बंद पडल्याचे चित्र आहे.

2 / 5
सोयगाव तालुक्यातील तिडका नदीला तुफान पूर आला आहे. या पुरामुळे सोयगाव मार्गे पाचोरा जोडणारा राज्यामर्ग बंद पडला आहे. त्यामुळे औरंगाबाद जळगाव या दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. सध्या नदीच्या काठावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

3 / 5
शनिवारी पहाटेपासून सुरु असलेल्या पावसामुळे नारेगाव आणि पिसादेवी परिसरात घुसले पावसाचे पाणी घुसले. रात्रीतून अचानक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने येथील वस्तू आणि मालाचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी गावात आणि रस्त्यावर साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

4 / 5
शहर परिसरात मध्यरात्रीपासून ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले. काही भागात पाण्याचे लोंढे वाहू लागले. वेगाने वाहणारं पाणी नागरिकांच्या घरात-दुकानात शिरलं. शहरातील नारेगाव आणि पिसादेवी परिसरात पावसाचे पाणी घुसले. यामुळे दुकानांचे मोठे नुकसान झाले.

5 / 5
औरंगाबाद परिसरात झालेल्या मुसळदार पावसामुळे सुकना नदीने रुद्ररूप धारण केले आहे. सईनगर मधील अनेक घराची पडझड होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहिल्यामुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.