औरंगाबादेत डिझेलची शंभरी पार, पेट्रोलही कडाडले, राज्यात सर्वात महाग डिझेल कुठे?

सध्या औरंगबााद शहरात 109.94 रुपये प्रति लीटर या दराने पेट्रोलची विक्री होत आहे. पेट्रोलच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास पेट्रोल 110 रुपयांचा आकडा पार करेल.

औरंगाबादेत डिझेलची शंभरी पार, पेट्रोलही कडाडले, राज्यात सर्वात महाग डिझेल कुठे?
पेट्रोल-डिझेल
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 06, 2021 | 11:11 AM

औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel price hike) दरात नियमित वाढ सुरु आहे. मंगळवारी डिझेलच्या दराने तर शहरात (Aurangabad city) शंभरी पार केली. मंगळवारी औरंगाबाद शहरात डिझेलचा भाव 100.09 पैसे प्रति लीटर एवढा झाला. पेट्रोलच्या दरानेही 15 मे रोजी भाववाढीची शंभरी पार केली होती. त्यानंतर आता तब्बल 143 दिवसांनंतर शहरात डिझेलच्या दरांनीही शंभराचा आकडा पार केला.

अमरावती अन् औरंगाबादेतच डिझेल शंभरी पार

पेट्रोल आणि डिझेलचे भाव लक्षात घेता, राज्यात परभणीत सर्वात महाग पेट्रोलचे दर आहेत. तर डिझेलच्या बाबतीत पाहिले असता,  महाग डिझेल विक्रीसाठी राज्यात अमरावतीचा पहिला क्रमांक लागतो आणि त्यानंतर औरंगाबाद शहराचा नंबर लागतो. अमरावतीत डिझेलचे दर 100 रुपये 30 पैसे असा आहे. तर त्यानंतर औरंगाबादचा क्रमांक लागतो. आगामी काळात डिझेलची शंभरी पार करणाऱ्या शहरांमध्ये परभणी आणि नांदेड शहरांचाही नंबर लागू शकतो.

पेट्रोलची दरवाढ 110 रुपयांकडे

सध्या औरंगबााद शहरात 109.94 रुपये प्रति लीटर या दराने पेट्रोलची विक्री होत आहे. पेट्रोलच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास पेट्रोल 110 रुपयांचा आकडा पार करेल. सध्या परभणीत पेट्रोल 111.15 रुपये प्रति लीटर दराने पेट्रोल विकले जात आहे. नांदेड, रत्नागिरी, बुलडाणा, अमरावती या शहराने आधीच 110 चा आकडा पार करून 111 च्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

कोणत्या जिल्ह्यात पेट्रोलचे किती भाव?

औरंगाबाद- 109.94, बीड- 109.68, हिंगोली 109.61, लातूर 109.66, नांदेड 110.92, उस्मानाबाद 108.98, परभणी 111.15, आणि जालना 109.81 रुपये प्रतिलीटर असे पेट्रोलचे भाव सध्या सुरु आहेत.

डिझेलचे भाव कोणत्या जिल्ह्यात किती?

औरंगाबादेत डिझेल 100.09, बीड- 98.27, हिंगोली 98.22, लातूर 98.26, नांदेड 99.47, उस्मानाबाद 97.60 परभणी 99.67, आणि जालना 98.39 प्रती लीटर असे सध्या भाव आहेत.

ट्रान्सपोर्ट चालक व व्यावसायिकांना चिंता

औरंगाबादेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे ही वाढ होत असल्याची माहिती पंप विक्रेत्यांकडून देण्यात येत आहे. गेल्या 13 दिवसातच डिझेलचे दर 2 रुपये 57 पैशांनी वाढले आहेत. आगामी काळातही ही वाढ चालूच राहिल, असा अंदाज पंप चालकांकडून व्यक्त केला जात आहे. त्याामुळे ट्रान्सपोर्ट चालक व व्यावसायिकांना मोठी चिंता लागली आहे.

इतर बातम्या- 

Petrol Diesel price : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

Petrol Diesel Price: पेट्रोलियम कंपन्यांचा मोठा निर्णय, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us