‘अहो नड्डा, जरूर पहा हा खड्डा’, सभेतला रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ ट्विट करत ठाकरे गटाचा खोचक शब्दांत निशाणा

अंबादास दानवे यांनी व्हिडीओ ट्विट करत जे पी नड्डा यांच्यावर खोचक शब्दांत टीका केलीय. "अहो अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा", अशी टीका दानवेंनी केलीय.

अहो नड्डा, जरूर पहा हा खड्डा, सभेतला रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ ट्विट करत ठाकरे गटाचा खोचक शब्दांत निशाणा
Chetan Patil | Updated on: Jan 02, 2023 | 10:07 PM

औरंगाबाद : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष कामाला लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रात येऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी शेड्डू ठोकलाय. नड्डा यांची आज दुपारी चंद्रपुरात सभा झाली. त्यानंतर त्यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. पण त्यांच्या औरंगाबादमधील सभेत अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जे पी नड्डा यांच्या सभेचा व्हिडिओल ट्विट केलाय.

अंबादास दानवे यांनी व्हिडीओ ट्विट करत जे पी नड्डा यांच्यावर खोचक टीका देखील केलीय. “अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा”, अशी टीका दानवेंनी केलीय.

“लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे”, असं अंबादाल दानवे म्हणाले.

भाजपचं ‘मिशन-145’

दरम्यान, जे पी नड्डा यांनी भाजपच्या ‘मिशन-144’ची घोषणा केलीय. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी ‘मिशन-144’ विषयी प्रतिक्रिया दिलीय. “राष्ट्रीय अध्यक्षांनी सगळ्यांना आदेश दिलाय की, देशातील सगळ्याच जागा आपल्याला लढायच्या आहेत त्याच भूमिकेत काम करा. तशातील ज्या चिन्हांकीत झालेल्या आहेत, 303 तर आम्ही जिंकलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त 144 जागा या अशा चिन्हांकीत झालेल्या आहेत की त्या जागांवर आपल्याला लक्ष केंद्रीत करण्यात आलं तर, 144 पैकी निम्म्या तरी जागा आपण काढू शकू. लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत 400 च्या पुढे जायचं आहे. त्यामुळे सगळ्याच जागा लढवायचं आहे, अशा भूमिकेत काम करण्याचे अध्यक्षांनी आदेश दिले आहेत”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us