औरंगाबादेत श्रेयवादावरुन शिवसेना भाजपमध्ये धुसफूस, मु्ख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन, भाजप आमदारानेही फोडला नारळ

| Updated on: Jan 15, 2021 | 7:51 PM

औरंगाबादेत विकासकामांच्या श्रेयवादावरुन धुसफूस होणं आता नित्त्याचं झालं आहे. यावेळी श्रेयवादाच्या धुसफुसीला कारण ठरलाय राज्य शासनाच्या निधीतून सुरु असलेले शहरातील 152 कोटींचे रस्ते...

औरंगाबादेत श्रेयवादावरुन शिवसेना भाजपमध्ये धुसफूस, मु्ख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन, भाजप आमदारानेही फोडला नारळ
Follow us on

औरंगाबादऔरंगाबादेत विकासकामांच्या श्रेयवादावरुन धुसफूस होणं आता नित्त्याचं झालं आहे. यावेळी श्रेयवादाच्या धुसफुसीला कारण ठरलाय राज्य शासनाच्या निधीतून सुरु असलेला 152 कोटींचा रस्ता… या रस्त्याचं भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करुनही भाजप आमदार अतुल सावे यांनी पुन्हा एकदा या रस्त्याला नारळ वाढवला आहे. (Battle of credit between Shiv Sena and BJP in Aurangabad)

दीडशे कोटींच्या रस्त्याचे भाजपने परस्पर उद्घाटन केले. आमदार अतुल सावे यांनी केलं शहरातील तीन रस्त्यांचे मिळून 15 कोटींच्या रस्त्यांचे उद्घाटन केलं. पूर्व विधानसभा मतदारसंघात सिडको चौक ते मुकूंदवाडी रेल्वेस्टेशन, भवानी पेट्रोल पंप ते ठाकरेनगर, महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी या रस्त्यांची कामे केली जात आहे. याच कामांचं भूमीपूजन भाजप आमदार सावे यांनी केलं.

आमदार सावे यांच्या भूमीपूजन कार्यक्रमावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. सेनेचे पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत भूमीपूजनाचा कार्यक्रम म्हणजे लोकाच्या लेकराला स्वत:चं नाव देण्याचा प्रकार आहे, अशी जळजळीत टीका केली.

औरंगाबाद महापालिका निवडणूक

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे.  महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. शिवसेना आणि मनसेने संभाजीनगरचा मुद्दा उकरून काढून त्यावर राजकारण करायला सुरुवात केली आहे. तर राष्ट्रवादीकडून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

औरंगाबादसह चार बड्या महापालिकांची फेब्रुवारीत निवडणूक

कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील पाच बड्या महानगरपालिकांची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. याशिवाय, राज्यातील 96 नगरपालिकांसाठीही फेब्रुवारी महिन्याच्या आसपास निवडणुका पार पडतील. त्यामुळे राज्यात फेब्रुवारी महिन्यात राजकीय रणधुमाळी अनुभवायला मिळू शकते.

(Battle of credit between Shiv Sena and BJP in Aurangabad)

हे ही वाचा

स्पेशल रिपोर्ट : राष्ट्रवादीने रणशिंग फुंकलं, धनंजय मुंडेंऐवजी नव्या नेत्याकडे औरंगाबादची जबाबदारी

मुंडेंची गच्छंती, टोपे नवे संपर्कप्रमुख! औरंगाबाद पालिकेसाठी राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक : सध्याचं पक्षीय बलाबल काय सांगतं?