सरकारी मदतीची वाट न पाहता जिगरबाज मित्रांची कमाल, 30 लाख खर्चून 50 बेडच्या कोविड रुग्णालयाची उभारणी

| Updated on: May 30, 2021 | 4:37 PM

बीडमधील चार मित्रांनी एकत्र येत शिरुर येथे कोविड रुग्णालय उभारलं आहे. (ideal covid hospital at Shirur)

सरकारी मदतीची वाट न पाहता जिगरबाज मित्रांची कमाल, 30 लाख खर्चून 50 बेडच्या कोविड रुग्णालयाची उभारणी
आयडीयल कोविड सेंटर
Follow us on

बीड: ग्रामीण भागात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सरकारी मदतीची वाट न पाहता बीड जिल्ह्यातल्या चार मित्रांनी एकत्र येत सुसज्ज असं कोविड रुग्णालय उभारलं आहे.   हे रुग्णालय आता ग्रामीण भागातल्या रुग्णासाठी संजिवनी ठरतंय. (Beed Four doctor friends come together and started Covid hospital at shirur)

तीस लाखांचा खर्च

बीडच्या शिरूर मध्ये असलेल्या आयडीयल इंग्लिश स्कूल मध्ये उभारलेल हे आहे 50 बेडसच सुसज्ज असं कोविड रुग्णालय आहे. शिरूर मधील चार मित्र एकत्र आले आणि त्यांनी तब्बल तीस लाख रुपयांचा खर्च करून ग्रामीण भागातील रुग्णासाठी हे रुग्णालय सुरु केलंय. अभिजित डुंगरवाल, भगवान सानप, प्रकाश देसरडा आणि गणेश देशपांडे हे चार जिगरबाज मित्र आहेत. रुग्णांची होणारी फरफट पाहून, सरकारी मदतीची वाट न पाहता, या चौघांनी ना नफा ना तोटा या संकल्पनेतून सुरु केलेल्या रुग्णालयात 12 ऑक्सिजन बेड आहेत तर कोरोनाचे सौम्य लक्षणं असलेल्यासाठी 38 बेडची व्यवस्था करण्यात आलीय. या रुग्णालयात रुग्णांकडून आकारले जाणारे शुल्क शासनाच्या नियमांपेक्षा कमी असून जेवण आणि इतर सुविधा मोफत दिल्या जातायत, अशी माहिती डॉ. भगवान सानप यांनी दिली.

आयडियल कोविड सेंटर

तज्ज्ञ डॉक्टरांची टीम

सध्या शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. तर शासकीय रुग्णालयात जागाच शिल्लक नसल्याने अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, खासगी रुग्णालयाचा खर्च सर्वसामान्य रुग्णांना परवडणारा नाही म्हणून आता अनेक रुग्ण माफक दरामध्ये या रुग्णालयात उपचार घेतायत. या रुग्णालयात 10 तज्ञ डॉक्टरांची टीम असुन प्रशिक्षित असा मोठा नर्सिंग स्टाफ आहे. इसिजी, एक्सरे, रुग्णवाहिका आणि ऑक्सिजची अद्यावत सेवा असलेल्या या रुग्णालयाचा ग्रामीण भागातील रुग्णांना लाभ मिळतोय. आज हे रुग्णालय सुरू होऊन महिना होतोय. मात्र इथला डेथ रेट झिरो ठेवण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांना यश आलय. रुग्णांचा मृत्यु न होऊ देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रकाश देसारडा यांनी सांगितलं,

आदर्शवत उपक्रम

कोरोनाचा प्रसार शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे. मात्र शहरी भागात जेवढ्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. तेवढ्या ग्रामीण भागामध्ये पोहोचत नाहीयेत, आणि म्हणून कोरोनाला हरवण्यासाठी दुर्गम आणि मागास गावांमध्ये अशा जिगरबाज मित्रांनी समोर येणं गरजेचं आहे.

संबंधित बातम्या:

Weather Alert | मान्सूनचं आगमन लांबणीवर, केरळमध्ये 3 जूनला धडकणार, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

VIDEO | कोरोना काळात जीवलगांच्या अंतिम दर्शनासाठी नातेवाईकांचा खटाटोप, CCTV मुळे अंत्यविधी पाहता येणार

(Beed Four doctor friends come together and started Covid hospital at shirur)