VIDEO | कोरोना काळात जीवलगांच्या अंतिम दर्शनासाठी नातेवाईकांचा खटाटोप, CCTV मुळे अंत्यविधी पाहता येणार

कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झालेल्या व्यक्तीचे तिच्या नातेवाईकांना अंतिम दर्शनही अनेकदा होऊ शकत नाही, अशी विदारक परस्थिती ओढावली आहे.

VIDEO | कोरोना काळात जीवलगांच्या अंतिम दर्शनासाठी नातेवाईकांचा खटाटोप, CCTV मुळे अंत्यविधी पाहता येणार
nanded
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 4:39 PM

नांदेड : कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झालेल्या व्यक्तीचे तिच्या नातेवाईकांना अंतिम दर्शनही अनेकदा होऊ शकत नाही, अशी विदारक परस्थिती ओढावली आहे. पण यावर पर्याय शोधत नांदेड येथील गोवर्धन घाट स्मशानभूमीने ऑनलाईन अंत्यविधी पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीचे किमान अंतिम दर्शन घेण्याचे समाधान अनेकांना मिळणार आहे. (Everyone can watch Funeral by using live CCTV footage of graveyard)

कोरोनाने मृत्यू झाल्यास अंत्यविधी करण्यासाठीही अनेक नियम घालण्यात आले आहेत. अंत्यविधीत मोजक्याच लोकांना उपस्थित राहण्याची परवाणगी आहे. शिवाय लॉकडाऊनमुळे जाण्यायेण्यासही अनेक निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत परराज्यात किंवा परदेशात राहाणाऱ्यांना जर आपल्या जीवलगांचे, नातेवाईकांचे अंतिम दर्शनही घेता येऊ शकत नाही. परंतु यावर नांदेडच्या गोवर्धन घाट स्मशानमभूमीने तंत्रज्ञानाच्या मदतीने पर्याय शोधला आहे.

नांदेडच्या गोवर्धन घाट स्मशानमभूमीने स्मशानभूमी परिसरात 8 हाय डेफिनेशन सीसीटीव्ही कॅमेरे लावून ऑनलाईन अंतिम दर्शन घेण्याची सुविधा इथे निर्माण करण्यात आली आहे. या हाय डेफिनेशन कॅमेऱ्यातून युजरला झूम इन (Zoom) किंवा झूम आऊट (Zoom out) करूनसुद्धा अंत्यविधी पाहता येऊ शकणार आहे. ही सर्व सुविधा अंतिम विधीसाठी आलेल्या लोकांनी (मृतांच्या नातेवाईकांनी) केलेल्या दानातून निर्माण करण्यात आली आहे.

अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत काहीवेळ आगोदर बुकींग करावी लागते. त्याचवेळी नातेवाईकांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा पासवर्ड दिला जाणार, अंत्यविधीची वेळही सांगितली जाणार, त्यामुळे नातेवाईकांना ई विझ हे अॅप्लिकेशन वापरून जगभरात कुठूनही अंत्यविधी पाहता येऊ शकणार आहे, अशी माहिती गोवर्धन घाट स्मशानभूमीचे व्यवस्थापक नरेश गायकवाड यांनी दिली.

व्हिडीओ पाहा

नरेश गायकवाड म्हणाले की, एखाद्या चांगल्या प्रसंगात ऊपस्थित राहता आले नाही तरी अंत्यविधीसारख्या दुःखाच्या समयी सर्व नातलग, आप्तेष्ट उपस्थित राहतात अशी आपली संस्कृती आहे. पण कोरोनाच्या या महामारीत अंतिम दर्शनसुद्धा घेणे शक्य होत नाही. त्यावर या गोवर्धन घाट ट्रस्टने शोधलेला पर्याय अनेकांना दिलासा देणारा ठरणार आहे.

इतर बातम्या

Corona Cases In India | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत 12 हजारांनी घट, कोरोनाबळीही कमी

कोरोनाशी लढण्यासाठी योग्य धोरण हवं, ‘निरर्थक बात’ नको; राहुल गांधींची टीका

Lockdown: जाणून घ्या देशभरातील लॉकडाऊनची परिस्थिती, कुठली राज्यं अनलॉक होण्याची शक्यता?

(Everyone can watch Funeral by using live CCTV footage of graveyard)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.