AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत 12 हजारांनी घट, कोरोनाबळीही कमी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 78 लाख 94 हजार 800 वर गेला आहे. (New 165553 Corona Cases )

Corona Cases In India | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत 12 हजारांनी घट, कोरोनाबळीही कमी
| Updated on: May 30, 2021 | 9:42 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) सलग तिसऱ्या दिवशी मोठी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 12 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 65 हजार 553 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 46 दिवसांनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या निचांकी आकड्यांवर गेली आहे. कालच्या दिवसात 3 हजार 460 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे (New 165553 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 65 हजार 553 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 460 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 76 हजार 309 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 78 लाख 94 हजार 800 वर गेला आहे. देशात 2 कोटी 54 लाख 54 हजार 320 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 25 हजार 972 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 21 लाख 14 हजार 508 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 21 कोटी 20 लाख 66 हजार 614 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 1,65,553

देशात 24 तासात डिस्चार्ज – 2,76,309

देशात 24 तासात मृत्यू – 3,460

एकूण रूग्ण –  2,78,94,800

एकूण डिस्चार्ज – 2,54,54,320

एकूण मृत्यू – 3,25,972

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 21,14,508

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 21,20,66,614 (New 165553 Corona Cases )

संबंधित बातम्या :

कोरोना संपूर्ण जगात पसरला होता; मात्र ब्लॅक फंगसचा फैलाव केवळ भारतातच का ?

व्हिएतनाममध्ये सापडला कोरोनाचा धोकादायक व्हेरिएंट, हवेतून वेगाने संसर्ग

(New 165553 Corona Cases in India in the last 24 hours)

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.