Bhandara | कोरोनात जिच्या पतीचा झाला मृत्यू तिनेच सावरला व्यवसायाचा गाडा, भंडाऱ्यातील महिलेची संघर्षमय कहाणी

| Updated on: Feb 17, 2022 | 12:00 AM

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर, ही बहिणाबाई चौधरी यांची कविता. कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर पत्नीने जगण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी कसा संघर्ष केला याचा प्रत्यय भंडाऱ्यात आला. त्याचीच ही कहाणी...

Bhandara | कोरोनात जिच्या पतीचा झाला मृत्यू तिनेच सावरला व्यवसायाचा गाडा, भंडाऱ्यातील महिलेची संघर्षमय कहाणी
अनिता रवी क्षीरसागर
Follow us on

तेजस मोहतुरे

भंडारा : कोरोना महामारीमध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला. त्यातही बऱ्याच कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचा (family head) मृत्यू झाला. कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर पत्नीला जगण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. भंडारा शहरातील अशाच एका स्त्रीचा संघर्षाची (woman’s struggle) बातमी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पतीच्या अकाली मृत्यूनंतर या स्त्रीचे जीवन विस्तवातील निखाऱ्यासारखे झाले. विशेष म्हणजे याच विस्तवाच्या निखाऱ्यातून तिला जगण्याची नवी उमेद (new hope) मिळाली. दुसऱ्या लाटेत 27 एप्रिल 2021 मध्ये भंडारा शहरातील रवी क्षीरसागर या 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरोनामुळे अवघ्या आठ दिवसांमध्ये त्याचा मृत्यू झाला. रवीच्या मृत्युमुळे त्याची पत्नी आणि दोन मुलांवर जणू आभाळच कोसळले. कारण रवी हा घरचा कर्ता पुरुष होता.

अनिताकडे आता आईसोबत, वडिलांचीही जबाबदारी

रवीच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी अनिता एकटी पडली. 9 व्या वर्गात शिकणारा एक मुलगा, 7 व्या वर्गात शिकणारा दुसरा मुलगा. या दोन्ही मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करावे, पैसा कुठून आणावा, जगावं कसं असे बरेच प्रश्न अनितासमोर निर्माण झाले. त्यामुळं आपणही मरून जावं असं तिच्या मनात बऱ्याचदा आलं. मात्र माझ्यानंतर या मुलांचं काय ह्या विचाराने तिला जगण्याची नवी उमेद मिळाली. पतीच्या आकस्मिक मृत्युमुळे आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक ताण अतिशय कठीण असतो. आई आणि बाप होण्याचे दोन्ही कर्तव्य पूर्ण करताना अनिताची तारेवरची कसरत होत आहे.

रडून काही होत नसतं, संघर्ष करावाच लागतो

रवी क्षीरसागर हा भंडारा शहरातील गांधी चौकात एका छोट्याशा ठिकाणी कपडे प्रेस करण्याचा काम करीत होता. त्याच्या मृत्यूनंतर अनितानेही हाच काम करून उदरनिर्वाह करण्याचे ठरविले. मात्र या अगोदर कधीही तिने हातात प्रेस घेतली नव्हती. त्यामुळे सुरुवातीला तिने तिच्या दिराकडून हे काम शिकून घेतले. ज्या ठिकाणी अनिताला कपडे प्रेस करण्याचे काम करायचे होते, तो परिसर सतत कामगार लोक आणि इतर लोकांमुळे गजबजलेला असतो. त्या लोकांचे बोलणे त्यांच्या नजरा या अनिताला सुरुवातीच्या काळात अतिशय असहनीय झाले. त्यामुळे पहिले आठ दिवस काम करून आल्यानंतर अनिता रवींच्या फोटो समोर बसून सतत रडत राहिली. मात्र भविष्याचा विचार करून या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत पुन्हा त्याच ठिकाणी येऊन तोच व्यवसाय सुरू ठेवला आहे.

Nagpur Corona | कोरोनाचे निर्बंध धाब्यावर, कोचिंग क्लासेस सुरू, मनपाने काय केली कारवाई?

Nagpur | आशियाई सॉफ्टबॉल निवड चाचणी स्पर्धेचा समारोप; भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी

आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू काय करतो माहीत आहे का?, वाचा नागपुरातील दिव्यांग खेळाडूचा जीवन संघर्ष