धनंजय मुंडेंच्या समाजकल्याण खात्यात लाखोंचा भ्रष्टाचार

| Updated on: Feb 17, 2021 | 3:11 PM

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. | dhananjay munde samajkalyan ministry

धनंजय मुंडेंच्या समाजकल्याण खात्यात लाखोंचा भ्रष्टाचार
बीड येथील सामाजिक न्याय विभागात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाला आहे.
Follow us on

बीड: बीड येथील सामाजिक न्याय विभागात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचे उघड झाला आहे. बीडच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराची तक्रार थेट आयुक्ताकडे केली आहे. (Corruption in dhananjay munde samajkalyan ministry)

याप्रकरणात संबंधितावर कारवाई करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आयुक्तांनी यापूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, बरेच दिवस उलटूनही या अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेत अजय सरवदे यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते उपोषणासाठी बसले आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर सुरु असलेल्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे याप्रकरणात काही पावले उचलणार का, हे पाहावे लागेल.

…आणि धनंजय मुंडेंनी सरकारी अधिकाऱ्याला भर बैठकीतून हाकलले!

पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे (Utkarsh Gutte) यांना हाकलवून लावले होते. या बैठकीला सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित होते. बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना अहवाल मागवून देखील सादर केला नाही. त्यामुळे संतापलेल्या धनंजय मुंडे आणि नियोजन समितीवरील सदस्यांचा पारा चढला. येथे कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे खडे बोल सुनावत धनंजय मुंडे यांनी गुट्टे यांना भर बैठकीतून हाकलून दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अधिकाऱ्यावर तातडीने निलंबन करण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचित केले आहे. या सर्व प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली होती.

उत्कर्ष गुट्टे हे बीड नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्यावेळी नियोजन समितीच्या बैठकीत गुट्टे यांना नगरपालिकेतील कामकाजाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश नियोजन समितीने दिले होते. आज नियोजन समितीच्या बैठकीत मुख्याधिकारी गुट्टे यांना अहवालाविषयी विचारणा केली असता कामाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केल्याची खोटी माहिती दिली होती.

जिल्हा प्रशासनाकडून कसलाच अहवाल प्राप्त झाला नसल्याचे उघड झाल्यावर मुख्याधिकारी गुट्टे यांचा खोटारडेपणा उघड झाला. यावेळी नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच भडकले. गुट्टे यांच्या कामाचा पाढा इतर सदस्यांनी देखील वाचून दाखविला. इथं कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे खडेबोल धनंजय मुंडे यांनी सुनावीत मुख्याधिकारी गुट्टे यांना भर बैठकीतून अक्षरशः हाकलून दिले होते.

(Corruption in dhananjay munde samajkalyan ministry)