Wardha | फोटो स्टुडिओच्या नावाखाली शासकीय प्रमाणपत्रांचा काळाबाजार तहसील पथकानं केला उघड

| Updated on: Feb 18, 2022 | 3:27 PM

वर्धा इथल्या विरूळ येथे चक्क फोटो स्टुडिओत (Photo studio) नागरिकांना शासनाचे बनावट (Bogus) प्रमाणपत्र (Certificate) दिले जात होते. हा धक्कादायक प्रकार आर्वी तहसीलकार्यालयाच्या पथकाने उघडकीस आणलाय. या प्रकरणी दाखल करण्यात आला आहे.

Follow us on
नागरिकांना शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागपत्र उपलब्ध व्हावे म्हणून महा ई सेवा केंद्राची स्थापना प्रत्येक गावात शासनाकडून करण्यात आली आहे. मात्र वर्धा इथल्या विरूळ येथे चक्क फोटो स्टुडिओत (Photo studio) नागरिकांना शासनाचे बनावट (Bogus) प्रमाणपत्र (Certificate) दिले जात होते. हा धक्कादायक प्रकार आर्वी तहसीलकार्यालयाच्या पथकाने उघडकीस आणलाय. या प्रकरणी पुलगाव पोलिसांत नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूतन गोविंदराव सोनटक्के असे आरोपीचे नाव असून चित्रलेखा फोटो स्टुडिओतून अनधिकृतरित्या हे काम सुरू होते. शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी एका महिलेने उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर केली. तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी यासंदर्भात तपासणी केली असता उत्पन्नाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच नायब तहसीलदार विनायक मगर यांच्यासह काही कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून संबंधित सेतू केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश दिले. या पथकाने तपासणी केली असता हा बनावट कागदपत्राचा काळाबाजार उघडकीस आला.