महापालिकेने मालकांना नोटिसा बजावल्यानंतर जुने, मोडकळीस आलेले आणि अनधिकृत वाडे पाडण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळ्यात केलेल्या वार्षिक सर्वेक्षणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
संभाजीराजेंविषयी आदर आहे. यावरून आम्हाला लक्ष्य करणाऱ्यांची उडी फसलेली आहे. आम्ही त्यांना शिवसेना पक्षातर्फे लढण्याचे आवाहन केले होते, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी शाहू छत्रपतींच्या भेटीअगोदर प्रतिक्रिया दिली होती.
आपल्या गावामध्ये, शहरामध्ये तसेच दुकानाच्या शेजारी आंब्याच्या किंवा इतर कोणत्याही व्यवसायासाठी येत असेल तर त्वरीत पोलिसांना कळवावे. ज्यांची वाहने चोरी झाली आहेत, त्यांनी कागदपत्रे आणून आपल्या ताब्यात घ्यावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
डॉक्टरांनी नारायण राणे यांना अॅन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया पार पडली. अॅन्जिओप्लास्टीनंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आता डिस्चार्ज दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार नास्तिक असल्याचा थेट आरोप केला होता. त्यानंतर शरद पवारांनी गणपतीचे दर्शन घेण्याचाही निर्णय घेतला, मात्र ऐनवेळी त्यांनी मांसाहारचे कारण देत मंदिराच्या आत जाणे टाळले आणि बाहेरूनच दर्शन घेतले. त्यावरून अमेय खोपकर यांनी निशाणा साधला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रीडा संकुलाच्या कार्यक्रमावेळी अनुराग ठाकूर आणि सूनेत्रा पवार यांनी लेझर फायरिंग केले. अंजली भागवत यांनी मार्गदर्शन केल्यावर सुनेत्रा पवार यांनी लेझर फायरिंग केले.
धनगर समाजातील आठ कुटुंबांनी याची तक्रार जिल्हाधिकारी पोलीस मुख्यालय यांच्याकडेसुद्धा केली आहे. पोलीस महासंचालकांनी अर्जाची दखल घ्यावी, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. पण हातकणंगले पोलिसांनी दखल न घेता तक्रारदारांनाच दमदाटी केली आहे.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था (Law & order) बिघडली असल्याचे विरोधक म्हणतात. मात्र अशी कोणतीही गंभीर परिस्थिती आपल्या राज्यात नाही. ती बिघडवणाऱ्यांसोबत कसे लढायचे, याचे मार्गदर्शन शरद पवार यांच्याकडून मिळत असल्याचे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
संजय जाधव यांनी राष्ट्रवादीवरही टीकेची झोड उठवली आहे. पुण्यात 25 ते 29 मे या कालावधीत शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाची पुण्यातील जबाबदारी जाधव यांच्यावर आहे.
उपग्रह प्रतिमेनुसार, केरळच्या किनारपट्टीवर आणि अग्नेय अरबी समुद्राला लागून असलेल्या ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे केरळमध्ये येत्या 2-3 दिवसांत म्हणजे 30 मेपर्यंत मान्सून सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.