AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरून संजय राऊत यांची थेट सरकारवर टीका, म्हणाले, मुंबईत..

राज्यासह देशात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यावरूनच आता संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी थेट म्हटले की, तुटवडा आहे हे त्यांनी मान्य केले पाहिजे. प्रमुख देवस्थानांनाही एलपीजी गॅस मिळत नाहीये.

एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरून संजय राऊत यांची थेट सरकारवर टीका, म्हणाले, मुंबईत..
Sanjay Raut
| Updated on: Mar 17, 2026 | 10:04 AM
Share

संजय राऊत यांनी नुकताच मोठे विधान केले. यादरम्यान त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, मराठवाडा आणि विदर्भात जास्त मदत करणे आवश्यक आहे. मग तिथे विरोधी पक्षाचे आमदार का असेना तिथेही विकासनिधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. बॅकलॉग असणाऱ्या ठिकाणी मदत करणे गरजेचे आहे. सरकार अनैतिक पद्धतीने निधी वाटप करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ज्यावेळी तुम्ही अध्यक्षाच्या पदावर बसलेले असता त्यावेळी तुमच्याकरिता सर्व पक्ष एकसारखी असतात मग तो सरकार असलेला पक्ष देखील. विधासभेचे अध्यक्ष असतील किंवा लोकसभेचे अध्यक्ष ते पूर्णपणे राजनैतिक दृष्टिकोनातून काम करतात. म्हणून कर्नाटकातील विधानसभा अध्यक्षांचा आर्दश सर्वांनी ठेवायला हवा. विधानसभाध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष पदावरील व्यक्ती निष्षक्ष असावी.

जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावर संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी बोलणे टाळले. राऊत म्हणाले की, या विषयावर महाराष्ट्रातील लोक बोलतील आणि कालही बोलले आहेत. ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट डेड अशी परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती आज एलपीजी गॅसच्या तुटवड्यासंदर्भात आहे.

रांगा लागलेले फोटो काय एआयने काढले आहेत का? आज मुंबईमध्ये 40 टक्के रेस्टारंट बंद आहेत. मुंबईमध्ये शाळांच्या कटिंगमध्ये एलपीजी मिळत नाहीये. खाण्याच्या वडापावच्या वगैरे गाड्या असतात, त्याही 50 टक्के बंद आहेत. तुम्ही म्हणत आहात की, परिस्थिती चिंताजनक नाही, काही अडचणी नाही. तुम्ही खोटं बोलू नका. अनेक प्रमुख जे देवालय आहेत, काशी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ आहे.

तिथे जे अन्नपूर्णा मंदिर आहे, तिथे गेले 40 वर्ष अखंड दोन वेळा भक्तांना जेवण दिले जाते. पण आता ते अन्नछत्र एलपीजी गॅलच्या तुटवड्यामुळे बंद झालेले आहे. शिर्डीमध्येही तशीच परिस्थिती आहे. दोन लाडू प्रसादाचे द्यायचे आता ते एकच देतात. आपण हिंदुत्ववादी आहात ना… मग निदान देवळांनातरी एलपीजी द्या, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले