Gajanan Maharaj Punyatithi: शेगावात गजानन महाराजांचा पुण्यतिथी सोहळा, यंदाच्या सोहळ्यात काय विशेष? जाणून घ्या

| Updated on: Sep 01, 2022 | 9:36 AM

शेगावात जवळपास हजारोंच्या संख्येने दिंड्या दाखल झाल्या असून पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींची पालखी अश्व ,रथ, मेनादिंडी आदि वैभवासह सपूर्ण गावात नगर परिक्रमा करत असते. यावेळी टाळ मृदुंगाच्या निनादात हरी नामाच्या गजराने शहरातील वातावरण अगदी भक्तिमय होऊन जाते.

Gajanan Maharaj Punyatithi: शेगावात गजानन महाराजांचा पुण्यतिथी सोहळा, यंदाच्या सोहळ्यात काय विशेष? जाणून घ्या
शेगाव येथील गजानन महाराज मंदिर
Image Credit source: Social Media
Follow us on

शेगांव,  शेगांवच्या  संत श्री गजानन महाराजांची आज 112 वी पुण्यतिथी (Gajanan Maharaj Punyatithi) आहे. यानिमित्याने मोठ्या संख्येने भाविक शेगांव (Shegaon) येथे दाखल झालेले आहेत. भाविकांनी शेगांव येथे महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.  गजानन महाराजांनी आठ सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतली होती. त्यामुळे हा दिवस श्री संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव (Punyatithi Utsav) म्हणून साजरा केला जातो. सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणि विशेषता ग्रामीण भागातून हजारो भजनी दिंड्यासुद्धा सहभागी होतात. शेगावात जवळपास हजारोंच्या संख्येने दिंड्या दाखल झाल्या असून पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींची पालखी अश्व ,रथ, मेनादिंडी आदि वैभवासह सपूर्ण गावात नगर परिक्रमा करत असते. यावेळी टाळ मृदुंगाच्या निनादात हरी नामाच्या गजराने शहरातील वातावरण अगदी भक्तिमय होऊन जाते. श्री संत गजानन महाराज संस्थान तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या वर्षभरातील उत्सवापैकी हा देखील एक मोठा उत्सव असतो.

असा असेल कार्यक्रम

आज सकाळी 10 वाजता यागाची पुर्णाहूती व अवभृत स्नान श्रीचे सेवाधारी व्यवस्थापकीय विश्‍वस्त व विश्‍वस्त मंडळ व ब्रम्हवृंद यांच्या उपस्थितीत पार पडेल.  दुपारी उत्सवाची पालखीचे श्रींच्या रजत मुखवट्याचे पुजन झाल्यानंतर श्रींच्या पालखीचे रथ, मेणा, पताका टाळकरी, अश्‍वासह नगर परिक्रमेची निघेल. सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती व टाळकरी यांचा आकर्षक रिंगण सोहळा  होणार आहे. रात्री 8 ते 10 हभप भरतबुवा म्हैसवाडीकर यांचे कीर्तन होणार आहे. 2 ऑगस्ट रोजी हभप श्रीधरबुवा आवारे मु.खापरवाडी यांचे सकाळी 6 ते 7 काल्याचे कीर्तन होईल व नंतर दहीहंडी गोपाळकाला कार्यक्रम होणार आहे.

 

हे सुद्धा वाचा