मुख्यमंत्री म्हणतात, सणांना आवर घाला, आता राणेंचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

| Updated on: Sep 07, 2021 | 7:10 PM

हिंदुंच्याच सणांनाच आवर का ? त्यांच्या जाहीर सभांना तसेच मोर्चांना का बंदी नाही ? घरांवर पाचशे लोक दगड मारायला एकत्र येतात. याला बंदी का नाही ? मुख्यमंत्री वागतात एक आणि बोलतात एक. जे दुसऱ्यांच्या घरावर दगड मारतात त्यांचा मुख्यमंत्री सत्कार करतात, असे नारायण राणे म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणतात, सणांना आवर घाला, आता राणेंचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान
NARAYAN RANE
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तसेच कोरोनाची तिसरी लाट या बाबी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी गणेशोत्सव तसेच आगामी सण साधेपणाने साजरे करण्याची गरज व्यक्त केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती घालत आहे. यांना घरात बसायचं आहे, अशी घणाघाती टीका राणे यांनी केलीय. तसेच हिंदूंच्याच सणांना बंदी का ? असा रोखठोक सवालही त्यांनी ठाकरे सरकारला केलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे 9 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होईल. केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. याबाबात माहिती देताना नारायण राणे पत्रकारांशी मुंबईत बोलत होते. यावेळी बोलत असाताना त्यांनी वरील भाष्य केले. (central minister narayan rane criticizes cm uddhav thackeray and maharashtra government on corona third wave and festival corona guidelines)

हिंदूंच्याच सणांना बंदी का ?

“हिंदुंच्याच सणांनाच आवर का ? त्यांच्या जाहीर सभांना तसेच मोर्चांना का बंदी नाही ? घरांवर पाचशे लोक दगड मारायला एकत्र येतात. याला बंदी का नाही ? मुख्यमंत्री वागतात एक आणि बोलतात एक. जे दुसऱ्यांच्या घरावर दगड मारतात त्यांचा मुख्यमंत्री सत्कार करतात. हे कोणत्या विचारसरणीचे मुख्यमंत्री आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ही भीती घालत आहेत. फक्त महाराष्ट्रातच तिसरी लाट आहे का ? बाकीच्या राज्यांत नाही का ? तिसऱ्या लाटेच्या नावाखाली यांना घरातच बसायचे आहे. एवढं करुनही एक लाख 57 हजार लोकांचा मृत्यू झालाच की. राज्यात लस नाही, डॉक्टर्स नाही, वॉर्डबॉय नाही, नर्स नाही अशी परिस्थिती झाली आहे. वैद्यकीय सुविधांची दयनीय अवस्था आहे,”  असे नारायण राणे म्हणाले.

9 ऑक्टोबरला चिपी विमानतळावरुन विमानोड्डाण

तसेच यावेळी बोलताना नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल माहिती दिली. येत्या 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळावरुन विमान उड्डाण सुरु होईल. त्याचे उद्घाटन हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते केले जाईल. या कार्यक्रमासाठी मी स्वत: तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील असे राणे म्हणाले. तसेच या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी अपस्थित राहावेच असे काही नाही, असे  म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबात संभ्रम निर्माण केला.

इतर बातम्या :

उद्घाटनाला मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही, राणेंनी डिवचलं; चिपी विमानतळाच्या श्रेयावरून राणे आणि शिवसेनेत जुंपणार?

Chipi Airport : चिपी विमानतळाचं उदघाटन नेमकं कधी? शिवसेना म्हणजे 7 ऑक्टोबर, राणेंची तारीखही जाहीर

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी; वाचा, आरोप काय?

(central minister narayan rane criticizes cm uddhav thackeray and maharashtra government on corona third wave and festival corona guidelines)