मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी; वाचा, आरोप काय?

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना ब्राह्मण समाजाविरोधात विधान करणं चांगलच भोवलं आहे. नंदकुमार बघेल यांना 21 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Nand Kumar Baghel)

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी; वाचा, आरोप काय?
Nand Kumar Baghel

रायपूर: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना ब्राह्मण समाजाविरोधात विधान करणं चांगलच भोवलं आहे. नंदकुमार बघेल यांना 21 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर बघेल यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायासाठी लढू असं विधान केलं आहे. (Nand Kumar Baghel father of Chhattisgarh CM Bhupesh Baghel arrested Sent to judicial custody)

ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्या केल्याबद्दल भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला होता. आज त्यांना रायपूरच्या एका न्यायालयासमोर आणण्यात आले. यावेळी मॅजिस्ट्रेट जनक कुमार हिडको यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यानंतर त्यांना 21 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कोर्टाच्या या शिक्षनंतर नंदकुमार बघेल यांनी जामीन न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. मी जामीन घेणार नाही. सर्वोच्च न्यायालयापर्यंत मी न्यायासाठी लढेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही: मुख्यमंत्री

वडील नंदकुमार बघेल यांच्यावर एफआयआर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अशा प्रकारच्या वक्तव्याने आपण दु:खी झालो आहोत असं म्हटलं होतं. आपल्या सरकारमध्ये कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. त्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील. माझे वडील 86 वर्षाचे आहेत. पण ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत. वडिलांसोबत माझे पहिल्यापासूनच वैचारिक मतभेद आहेत. हे सर्वांना माहीत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सर्व ब्राह्मण समाजाच्या तक्रारीनंतर डीडी नगर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री नंदकुमार बघेल यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. शनिवारीच सकाळी ब्राह्मण समाजाने मोठी रॅली काढून बघेल यांच्या विधानाचा निषेध नोंदवला होता. तसेच नंदकुमार बघेल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर भादंवि कलम 153-अ आणि 505-1, (ख) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बघेल काय म्हणाले होते?

नंदकुमार बघेल उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी ब्राह्मण हे विदेशी असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केलं होतं. ज्याची व्होट बँक त्याचंच सरकार. ज्या प्रकारे इंग्रज हा देश सोडून गेले होते, तसेच ब्राह्मणही हा देश सोडून जातील. ब्राह्मणांनी सुधरावे अथवा त्यांनी परतीसाठी सज्ज व्हावं, असं विधान बघेल यांनी केलं होतं. (Nand Kumar Baghel father of Chhattisgarh CM Bhupesh Baghel arrested Sent to judicial custody)

 

संबंधित बातम्या:

Belgaum Municipal Election final result 2021 : महाराष्ट्र एकीकरण समिती हरली, भाजपचा मोठा विजय!

5 राज्यात काँग्रेस साफ होणार? पंजाबमध्ये ‘आप’ सरकार? 2024 ला भाजपसाठी मार्ग सुकर? वाचा सर्वेक्षणाचं सविस्तर विश्लेषण

Kisan Mahapanchayat : कृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक, विविध मागण्यांसाठी 27 सप्टेंबरला भारत बंद, राकेश टिकैत यांची घोषणा

(Nand Kumar Baghel father of Chhattisgarh CM Bhupesh Baghel arrested Sent to judicial custody)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI