Belgaum Municipal Election final result 2021 : महाराष्ट्र एकीकरण समिती हरली, भाजपचा मोठा विजय!

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागाचं लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली. या निवडणुकीत 58 पैकी सर्वाधिक 36 जागा जिंकून भाजपनं महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला. भाजपच्या या यशामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला.

Belgaum Municipal Election final result 2021 : महाराष्ट्र एकीकरण समिती हरली, भाजपचा मोठा विजय!
बेळगाव
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 5:03 PM

बेळगाव : बेळगाव महानगरपालिका (Belgaum Election final result) निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) 35 वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. पहिल्यांदाच पक्षपातळीवर झालेल्या या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यामुळे आता बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागलं. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीची सीमाभागातील वाटचाल आता काही अंशी खडतर होणार आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागाचं लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली. या निवडणुकीत 58 पैकी सर्वाधिक 36 जागा जिंकून भाजपनं महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला. भाजपच्या या यशामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले, तर 10 ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. इतकंच नाही तर एक जागा जिंकत एमआयएमनेही बेळगावमध्ये आपलं खातं खोललं. गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या या निवडणुकीसाठी शुक्रवारी 50.41 टक्के इतकं मतदान झालं होतं.

बेळगाव महानगर पालिका निवडणुकीची वैशिष्ट्ये

  • इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली गेली
  • पहिल्यांदाच ही निवडणूक ईव्हीएम मशीनवर घेतली गेली
  • यावेळी प्रभाग रचनेत आणि मतदार यादीत देखील काही प्रमाणात बदल केले गेले
  • महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये यावेळी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यानं केवळ 21 जागांवर समितीला आपले अधिकृत उमेदवार देता आले
  • महाराष्ट्र एकीकरण समितीतील अनेक इच्छुकांना भाजपने उमेदवारी दिली. विशेषतः बेळगाव दक्षिण या मराठा बहुल भागात भाजपने खेळलेले मराठा कार्ड यशस्वी झालं.

बेळगाववासियांनी कामाची पोचपावती दिली : भाजप

केंद्र आणि राज्यात भाजपने केलेल्या कामाची पोचपावती बेळगाववासियांनी दिल्याची प्रतिक्रिया या निकालानंतर आमदार अभय पाटील यांनी दिली. तर अनेक उमेदवारांना सीमावासीयांच्या प्रश्नापेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटल्याने, इच्छुकांची मनधरणी करायला कमी पडलो, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एकीकरण समितीने दिली. इतकंच नाही तर प्रभाग रचना आणि मतदार यादीतील चुकांचा देखील फटका बसल्याचे समितीला वाटतंय

……………………….

निकालानंतर बेळगाव महानगरपालिका पक्षीय बलाबल

महाराष्ट्र एकीकरण समिती : 2 भाजप : 36 काँग्रेस : 09 अपक्ष : 10 एमआयएम : 1 एकूण जागा – 58

बेळगाव महानगरपालिकेच्या पस्तीस वर्षाच्या इतिहासात महाराष्ट्र एकीकरण समितीची एकहाती सत्ता होती. त्यामुळेच काही अपवाद वगळता महापौरपदाचा मान मराठी माणसालाच मिळाला. कदाचित त्यामुळेच महाराष्ट्र एकीकरण समितीकडे यावेळी इच्छुकांची संख्या वाढली, याचा मेळ घालणं समितीच्या नेत्यांना अखेरपर्यंत जमलं नाही. एकीकरण समितीचे निवडून आलेले दोनच उमेदवार आहेत. त्यामुळे एकीकरण समिती महापालिकेत प्रबळ विरोधक देखील होऊ शकेल का याबाबत आता शंका उपस्थित होते.

संबंधित बातम्या  

Belgaum Municipal Election Results 2021 Live : बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत

मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, बेळगावच्या भाजपच्या विजयावर राऊतांचा संताप

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.