Belgaum Municipal Election Results 2021 Live : बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 35 वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. पहिल्यांदाच पक्षपातळीवर झालेल्या या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यामुळे आता बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे.

Belgaum Municipal Election Results 2021 Live : बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत
फोटो : फाईल फोटो

बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 35 वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. पहिल्यांदाच पक्षपातळीवर झालेल्या या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यामुळे आता बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागलं. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीची सीमाभागातील वाटचाल आता काही अंशी खडतर होणार आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागाचं लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली. या निवडणुकीत 58 पैकी सर्वाधिक 36 जागा जिंकून भाजपनं महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला. भाजपच्या या यशामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले, तर 10 ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. इतकंच नाही तर एक जागा जिंकत एमआयएमनेही बेळगावमध्ये आपलं खातं खोललं. गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या या निवडणुकीसाठी शुक्रवारी 50.41 टक्के इतकं मतदान झालं होतं.

निकालानंतर बेळगाव महानगरपालिका पक्षीय बलाबल

महाराष्ट्र एकीकरण समिती : 2
भाजप : 36
काँग्रेस : 09
अपक्ष : 10
एमआयएम : 1
एकूण जागा – 58

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 06 Sep 2021 12:36 PM (IST)

  Belgaum Municipal Election Results : बेळगाव महापालिकेत भाजपला सर्वाधिक 36 जागा

  बेळगाव महापालिकेत भाजपला सर्वाधिक 36 जागा

  महाराष्ट्र एकीकरण समिती : 2
  भाजप : 36
  काँग्रेस : 09
  अपक्ष : 10
  एमआयएम : 1

 • 06 Sep 2021 10:54 AM (IST)

  Belgaum Municipal Election Results : बेळगाव महानगरपालिकेत भाजप बहुमताच्या दिशेने

  बेळगाव महानगरपालिकेत भाजप बहुमताच्या दिशेने

  आता पर्यंत 22 उमेदवार विजयी तर 9 ते 10 उमेदवार आघाडीवर

  बेळगाव महानगरपालिकेसाठी 29 ही आहे मॅजिक फिगर

  पहिल्यांदाच पक्षपातळीवर लढल्या गेलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप इतिहास रचण्याच्या मार्गावर

 • 06 Sep 2021 10:51 AM (IST)

  Belgaum Municipal Election Results : बेळगाव निवडणूक अपडेट (आतापर्यंत)

  महाराष्ट्र एकीकरण समिती : 3
  भाजप : 21
  काँग्रेस : 4
  अपक्ष : 5
  एमआयएम : 1

 • 06 Sep 2021 10:46 AM (IST)

  Belgaum Municipal Election Results : कोणत्या वॉर्डात कुणाचा विजय?

  वार्ड 23 जयंत विजयी भाजपा विजयी (शहापूर)
  वार्ड 30 – नंदू मिरजकर भाजपाचे विजयी
  वार्ड 41 – भाजपा मंगेश पवार विजयी
  वार्ड 52 :- खूर्षीद मूल्ला काँग्रेस विजयी
  वार्ड 38 – महंमद पटवेगार – विजयी
  वार्ड 1 : इक्रा मुल्ला – विजयी – अपक्ष
  वार्ड 4 – भाजपाचे जयतीर्थ सवदत्ती विजयी
  वार्ड 27 : रवी साळुंखे विजयी (अपक्ष)
  वार्ड 29 : भाजपाचे नितीन जाधव विजयी
  वार्ड 2 : मुजम्मील डोणी – विजयी – काँग्रेस – मुजम्मील डोणी तिसर्‍यांदा विजयी – 1600+ मतांनी विजयी
  वार्ड 16 – भाजपाचे राजू भातकांडे विजयी
  वार्ड 15 : भाजपा विजयी – सौ. नेत्रावती भागवत – 1285 मतं पडली – 142 मतांनी विजयी (महाद्वार रोड)
  वार्ड 3 : काँग्रेस विजयी – ज्योती कडोलकर (माळी गल्ली, कामत गल्ली)
  वार्ड 14 : शिवाजी मंडोळकर – विजयी – समिती
  वार्ड 11 : समीवुल्ला माडीवाले – काँग्रेस
  वार्ड 40 : रेश्मा कामकर – भाजपा – विजयी
  वार्ड 18 : शाहीदखान पठाण – विजयी – एमआयएम
  वार्ड 16 : भाजपा राजू भातकांडे – विजयी

 • 06 Sep 2021 10:03 AM (IST)

  Belgaum Municipal Election Ward 41 Results : भाजप उमेदवार मंगेश पवार विजयी

  बेळगाव महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 41 मधून भाजप उमेदवार मंगेश पवार यांनी विजय मिळवला आहे.

  काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचा मंगेश पवार पराभव केला आहे.

 • 06 Sep 2021 09:44 AM (IST)

  Belgaum Municipal Election Results : आतापर्यंतची बेळगाव निवडणूक अपडेट

  आतापर्यंतची बेळगाव निवडणूक अपडेट

  महाराष्ट्र एकीकरण समिती 1
  भाजप : 6
  काँग्रेस : 4
  अपक्ष : 3
  एमआयएम : 1

 • 06 Sep 2021 09:42 AM (IST)

  Belgaum Municipal Election Ward 22 Results : भाजप उमेदवार रवी सांबरेकर विजयी

  बेळगाव महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 22 मधून भाजप उमेदवार रवी सांबरेकर यांनी विजय मिळवला आहे.

  काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केला आहे.

 • 06 Sep 2021 09:36 AM (IST)

  Belgaum Municipal Election Ward 29 Results : भाजप उमेदवार नितीन जाधव विजयी

  बेळगाव महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 29 मधून भाजप उमेदवार नितीन जाधव यांनी विजय मिळवला आहे.

  संयोगीता हलगेकर यांचा पराभव झालेला आहे.

 • 06 Sep 2021 09:34 AM (IST)

  Belgaum Municipal Election Ward 16 Results : भाजप उमेदवार राजू भातकांडे विजयी

  बेळगाव महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 16 मधून भाजप उमेदवार राजू भातकांडे विजयी यांनी विजय मिळवला आहे.

  सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

  आतापर्यंत 15 जागांचे निकाल हाती आले आहेत

 • 06 Sep 2021 09:33 AM (IST)

  Belgaum Municipal Election Ward 19 Results : अपक्ष उमेदवार रियाज अहमद किल्लेदार विजयी

  बेळगाव महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 19 मधून अपक्ष उमेदवार रियाज अहमद किल्लेदार यांनी विजय मिळवला आहे.

  सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे

  बेळगाववर कुणाचा झेंडा, दुपारपर्यंत स्पष्ट होणार

 • 06 Sep 2021 09:27 AM (IST)

  Belgaum Municipal Election Ward Results : आतापर्यंतच्या निकालाचा आकडा, कुणाला किती जागा?

  बेळगाव

  निवडणूक अपडेट आतापर्यंत

  महाराष्ट्र एकीकरण समिती : 1
  भाजप : 4
  काँग्रेस : 4
  अपक्ष : 2
  एमआयएम : 1

 • 06 Sep 2021 09:23 AM (IST)

  Belgaum Municipal Election Ward 12 Results : अपक्ष उमेदवार मोदीमसाब मतवाले विजयी

  वॉर्ड क्रमांक 12 अपक्ष उमेदवार मोदीमसाब मतवाले विजयी झाले आहेत

  या वॉर्डामध्ये मोठी टक्कर पाहायला मिळाली. सरतेशेवटी सर्वांना बाजूला सारत अपक्ष उमेदवार मोदीमसाब मतवाले विजयी झाले आहेत.

 • 06 Sep 2021 09:23 AM (IST)

  Maharashtra Ekikaran Samiti result : बेळगाव महापालिकेवर कुणाचा झेंडा, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार

  महाराष्ट्र एकीकरण समितीने यावेळी 23 अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. उर्वरीत प्रभाग खुले सोडले आहेत. बेळगाव महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी 33 नगरसेवक निवडून येणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती व भाजपने 40 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा दावा केला असून आज सोमवार 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीतूनच खरं चित्रं स्पष्ट होणार आहे.

 • 06 Sep 2021 09:23 AM (IST)

  Belgaum Municipal Election Ward 40 Results : भाजप उमेदवार रेश्मा बसवराज कामकर विजयी

  वॉर्ड क्रमांक 40 भाजप उमेदवार रेश्मा बसवराज कामकर विजयी

 • 06 Sep 2021 09:22 AM (IST)

  Belgaum Municipal corporation election results : बेळगावमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण, पोलिस बंदोबस्त वाढवला

  मतमोजणी केंद्रावर मतमोजणीची तयारी सुरु झाली आहे. दुपारपर्यंत बेळगाव महापालिकेवर कुणाचा झेंडा, हे चित्र स्पष्ट होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रासह शहर आणि उपनगर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 • 06 Sep 2021 09:22 AM (IST)

  Belgaum Election result : बेळगाव महापालिकेवर भगवा फडकणारच, संजय राऊतांचा दावा

  बेळगाव महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षांकडून लढविली जात आहे. भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल, आम आदमी पार्टी व एमआयएम या पक्षाचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूकीतील रंगत व चुरस वाढली आहे. आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.

  संजय राऊत यांनी आज शुक्रवारी मिडीयाशी बोलताना बेळगाव पालिकेवर शिवरायांचा भगवा फडणार असल्याचा दावा केला. बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला होता.

  कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके त्यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसं उत्साही वातावरण दिसतंय. मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे. हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे, असं राऊत म्हणाले होते.

 • 06 Sep 2021 09:19 AM (IST)

  Belgaum Municipal Election Ward 21 Results : भाजप उमेदवार प्रीती कामगार विजयी

  वॉर्ड क्रमांक 21 मधून भाजपच्या उमेदवार प्रीती कामगार विजयी

 • 06 Sep 2021 09:15 AM (IST)

  Belgaum Municipal Election Results 2021 : अपक्ष उमेदवार इकरा मुल्ला विजयी

  प्रभाग क्रमांक 1 मधून इकरा मुल्ला विजयी झाले आहेत.

  इकरा मुल्ला अपक्ष उमेदवार होते. त्यांनी विजय मिळवला आहे.

 • 06 Sep 2021 09:13 AM (IST)

  Belgaum Municipal Election Results 2021 : भाजपच्या नेत्रा भगवती विजयी

  वॉर्ड नंबर 15 मधून भाजपच्या नेत्रा भगवती विजयी

  भाजपने बेळगाव महापालिकेत खातं खोललं

  शीतल नगरकर यांचा केला पराभव

 • 06 Sep 2021 09:13 AM (IST)

  Belgaum Municipal Election Results 2021 : महाराष्ट्र एकीकरण समितीने खातं उघडलं

  बेळगाव महानगरपालिकेचा पहिला निकाल हाती

  वॉर्ड नंबर 14 मधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिवाजी मंडूळकर विजयी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI