Video : आता वडेट्टीवारांनी शिवरायांचा अपमान केला? भाजपकडून व्हिडीओ ट्विट, उपाध्ये म्हणतात, ठाकरे काय अॅक्शन घेणार?
चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना त्यांची विटंबना केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

चंद्रपूरः बंगळुरू येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचे प्रकरण शमत असतानाचा आता महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनीच शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी यासंदर्भातला व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान करणाऱ्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर उद्धव ठाकरे काय अॅक्शन घेणार, असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.
चंद्रपुरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान?
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराजांच्या पुतळ्याच्या गळ्यात हार घालण्यासाठी पुतळ्याच्या भागावरच पाय ठेवला. यामुळे छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. तसेच यावर आता उद्धव ठाकरे काय कारवाई करणार, असा सवालही त्यांनी केला आहे.
महाआघाडी सरकारमधील मंत्री @VijayWadettiwar यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याचा भागावरच पाय ठेवला…@OfficeofUT काय ॲक्शन घेणार वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार? pic.twitter.com/Ire1qbJ798
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 27, 2021
इतर बातम्या-
एक रेल्वे गार्ड, एक फोटो, अन् जगलाल यांना काळजाचा तुकडा मिळाला; मनमाड स्टेशनवर मुलीच्या अपहरणाचा कट उधळला
Salman Khan snake bite | विषारी साप मला तीन वेळा चावला, खुद्द सलमान खानकडून ऐका भयावह घटना