मलिक जे बोलतात त्याविषयी त्यांच्याकडे कागदपत्रे असतात, भुजबळांचा नाशिकमध्ये दावा

| Updated on: Nov 01, 2021 | 5:11 PM

नवाब मलिक जे बोलतात त्याविषयी त्यांच्याकडे कागदपत्रे असतात. मात्र, ते काय बोलले माहित नाही, असे मत सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ते नामको बँकेच्या लोकार्पण सोहळ्यात आले असता बोलत होते.

मलिक जे बोलतात त्याविषयी त्यांच्याकडे कागदपत्रे असतात, भुजबळांचा नाशिकमध्ये दावा
छगन भुजबळ
Follow us on

नाशिकः नवाब मलिक जे बोलतात त्याविषयी त्यांच्याकडे कागदपत्रे असतात. मात्र, ते काय बोलले माहित नाही, असे मत सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ते नामको बँकेच्या लोकार्पण सोहळ्यात आले असता ते बोलत होते.

भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत एकत्र येत नाशिकमध्ये सोमवारी दुसरा कार्यक्रम केला. यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले, अनिल देशमुख यांनी प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. ते वेगवेगळ्या न्यायालयात गेले, पण आता आपली बाजू मांडण्यासाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. नवाब मलिकांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांविरोधात आरोपांची राळ उडवून दिली आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, नवाब मलिक जे बोलतात त्याविषयी त्यांच्याकडे कागदपत्रे असतात. मात्र, ते काय बोलले माहित नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दलसुद्धा चार प्रेमाचे शब्द व्यक्त केले. ते म्हणाले, मी ओबीसी बांधव, भगिनींसासाठी फार बोलतो. त्यांच्या आरक्षणावर गंडातर आले त्यासाठी बोलतो. माझं तोंड कोणीही बंद करू शकत नाही. राणे यांनी प्रेम दाखविले त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आता नवीन राणे, नवीन भुजबळ आहेत. जुने सोडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

नामको बँकेच्या उद्घान कार्यक्रमाचा सोहळा चांगलाच रंगला. यावेळी व्यासपीठावर भुजबळांच्या एका बाजूला पंकजा मुंडे आणि दुसऱ्या बाजूल गौतम ठाकूर होते. हा धागा पकडत भुजबळ म्हणाले की, माझ्या डावीकडे आणि उजवीकडे माझ्या मित्रांची मुले आहेत. मुंबईच्या MET चा प्लॉट घेण्यासाठी माझं राहत घर तारण ठेवलं. त्यासाठी पहिला चेक मला सारस्वत बँकेने दिला. काही दिवसांपूर्वी इथं प्रशासक मंडळ आलं. कसंय काही वेळेस खरं खोटं बालंट येते. मात्र, नंतर न्याय मिळतो, याचा अनुभव मला आहे. आमच्या नाशिकच्या NDCC बँकेवरही प्रशासक आलं. सगळे प्रशासक वाईट नसतात. तसे चांगलेही नसतात. सहकार हे माझं क्षेत्र नाही. मी कोणत्याही सहकारी संस्थेवर नाही, हे सांगायलाही भुजबळ विसरले नाहीत.

इतर बातम्याः

धूर फेकणारे कारखाने नकोत म्हणून पर्यटन कार्यक्रम आखला, भुजबळांचे प्रतिपादन; तर पंकजांनी लायब्ररी पाहून मास्टर्स करायची व्यक्त केली इच्छा!

सीटी स्कॅन नोंदीत झोल करून हॉस्पिटलला 17 लाखांचा गंडा; दोन कर्मचारी नाशिकमधून रफूचक्कर