धूर फेकणारे कारखाने नकोत म्हणून पर्यटन कार्यक्रम आखला, भुजबळांचे प्रतिपादन; तर पंकजांनी लायब्ररी पाहून मास्टर्स करायची व्यक्त केली इच्छा!

धूर फेकणारे कारखाने नकोत म्हणून नाशिकमध्ये पर्यटन कार्यक्रम तयार केला, असे प्रतिपादन सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. तर पंकजा यांनी, इथली अभ्यासिका पाहून मलाही मास्टर्स करावं वाटतंय, अशी इच्छा व्यक्त केली.

धूर फेकणारे कारखाने नकोत म्हणून पर्यटन कार्यक्रम आखला, भुजबळांचे प्रतिपादन; तर पंकजांनी लायब्ररी पाहून मास्टर्स करायची व्यक्त केली इच्छा!
पालकमंत्री छगन भुजबळ आणि भाजप नेत्या पकंजा मुंडे सोमवारी नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर आले.
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 1:25 PM

नाशिकः धूर फेकणारे कारखाने नकोत म्हणून नाशिकमध्ये पर्यटन कार्यक्रम तयार केला, असे प्रतिपादन सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते नाशिकमध्ये बोलत होते.

संदर्भसेवा रुग्णालयाचा उद्घाटन कार्यक्रम सोमवारी पार पडला. यावेळी भुजबळ बोलत होते. या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती होती. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी भुजबळ आणि पंकजा यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा योग जुळवून आणला होता. यावेळी भुजबळ म्हणाले की, गेली 2 वर्ष आपल्या साऱ्यांची दिवाळी घरात गेली. आता मात्र परिस्थिती सामान्य होत आहे. 10-15 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा पालकमंत्री झालो. तेव्हाच उद्योजकांना सांगितलं की, धूर फेकणारे कारखाने नकोत आणि नाशिकमध्ये पर्यटनाचे कार्यक्रम तयार केले. लोक इथे राहतील, पर्यटन वाढेल असा प्रयत्न केला. लोकांनी उपचारासाठी मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला यावे असाही प्रयत्न आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही साऱ्यांनी यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मला ही वाटतंय अभ्यास करावा

कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, भुजबळ साहेबांनी माझा सन्मान आधी केला. खरं तर मी त्यांच्या पेक्षा वयाने लहान आहे. मी त्यांच्या मित्राची मुलगी असल्यामुळे मानाने देखील लहान आहे. प्राध्यापक कॉलनीत सकाळी कार्यक्रम घेणं सोपं नाही. देवयानी ताईंची सकाळी थोडी तारांबळ उडाली असेल. अभ्यासिका ही काळाची गरज आहे. मुंडे साहेब राजकारणात असताना तरुणांनी, वंचितांनी राजकारणात यावं, अशी त्यांची इच्छा होती. इथली अशी अभ्यासिका आहे की, मलाही वाटतंय अभ्यास करावा आणि मास्टर्स करावं, असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

मी पहिल्यांदा पालकमंत्री झालो. तेव्हाच उद्योजकांना सांगितलं की, धूर फेकणारे कारखाने नकोत आणि नाशिकमध्ये पर्यटनाचे कार्यक्रम तयार केले. लोक इथे राहतील, पर्यटन वाढेल असा प्रयत्न केला. – छगन भुजबळ, पालकमंत्री

मुंडे साहेब राजकारणात असताना तरुणांनी, वंचितांनी राजकारणात यावं, अशी त्यांची इच्छा होती. इथली अशी अभ्यासिका आहे की, मला ही वाटतंय अभ्यास करावा आणि मास्टर्स करावं – पंकजा मुंडे, भाजप नेत्या

इतर बातम्याः

देवेंद्र फडणवीसांवर मलिकांचा गंभीर आरोप, पंकजा मुंडे म्हणतात, ‘हे अत्यंत हास्यास्पद’

सीटी स्कॅन नोंदीत झोल करून हॉस्पिटलला 17 लाखांचा गंडा; दोन कर्मचारी नाशिकमधून रफूचक्कर

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदार संघातल्या अनुदान वाटप घोळप्रकरणी अखेर दोषींवर होणार कारवाई

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.