CIDCO Lottery : सिडकोचे दिवाळी गिफ्ट! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली 7,849 परवडणाऱ्या घरांची घोषणा

| Updated on: Oct 25, 2022 | 5:46 PM

प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विनातळाजवळ हा गृह प्रकल्प असणार आहे.

CIDCO Lottery : सिडकोचे दिवाळी गिफ्ट! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली 7,849 परवडणाऱ्या घरांची घोषणा
Follow us on

नवी मुंबई : हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्वसामान्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सिडकोने परवडणाऱ्या घरांचे दिवाळी गिफ्ट सर्वसामान्यांना दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या घरांच्या लॉटरीची घोषणा केली आहे. सिडकोतर्फे 7,849 घरांच्या महागृहनिर्माण योजनेचा शुभारंभ दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विनातळाजवळ हा गृह प्रकल्प असणार आहे.

सिडकोच्या या महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईतील उलवे नोडमधील बामणडोंगरी, खारकोपर पूर्व 2ए, खारकोपर पूर्व 2बी आणि खारकोपर पूर्व पी3 येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांकरिता परवडणाऱ्या दरातील 7,849 घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 25 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात होणार आहे. सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेद्वारे हजारो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सिडकोने 7,849 सदनिकांची महागृहनिर्माण योजना आणली आहे. ‘परिवहन केंद्रित विकास’ संकल्पनेवर आधारित या योजनेंतर्गत उलवे नोडमधील बामणडोंगरी, खारकोपर पूर्व2ए, खारकोपर पूर्व 2बी आणि खारकोपर पूर्व पी3 येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांकरिता 7,849 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सिडकोची ही लॉटरी ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 25 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात होणार आहे.

या लॉटरीची सोडत 19 जानेवारी 2023 रोजी पार पडणार आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी, शुल्क भरणा इ. करीता https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.