Mumba MHADA Issue : मुंबईत म्हाडाचं चाललंय काय? रामनगरमध्ये शौचालय कोसळलं, दोन जखमी

| Updated on: Apr 25, 2022 | 3:56 PM

वारंवार दुरूस्तीची मागणी होऊनही म्हाडा प्रशासनाने दुर्लक्ष केले. तसेच महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली असता, त्यांनी सुद्धा म्हाडाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकली.

Mumba MHADA Issue : मुंबईत म्हाडाचं चाललंय काय? रामनगरमध्ये शौचालय कोसळलं, दोन जखमी
म्हाडा
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मुंबईत सर्वसामान्यांना जगणे सुरळीत करणारे ठिकाण म्हणजे म्हाडा (MHADA). म्हाडामुळे अनेक लोकांचे मुंबईतील हक्काच्या घराचे स्वप्न पुर्ण होत असते. पण आता स्वप्न पुर्ण करणारे म्हाडाच लोकांच्या जीवावर उठले आहे. प्रभाग 52 मध्ये म्हाडाच्या माध्यामातून अनेक शौचालये (Toilet) बांधण्यात आली होती. ज्यांची दुरावस्था झाली आहे. ते दुरुस्ती करण्यात यावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र म्हाडाच्या ढम्म कारभारामुळे आणि महापालिका प्रशासनाच्या (Municipal) जबाबदारी झटकण्याने येथे लोकांच्या जीव आणि आरोग्य धोक्यात आलं आहे. तसेच रामनगर येथील शौचालयाची दुरुस्ती न झाल्याने त्याचा काही भाग कोसळला. ज्यामुळे 2 नागरिकांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण म्हाडा व महापालिका हे लोकांचे जीव जाण्याचीच वाट पहात आहे का असा प्रश्न स्थानिक लोक विचारत आहेत.

2 नागरिकांना किरकोळ दुखापत

येथील प्रभाग 52 आणि रामनगर येथे म्हाडाच्या माध्यामातून अनेक शौचालये बांधण्यात आली होती. मात्र त्यांची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. ज्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य आणि जीव दोन्हीही धोक्यात आले होते. त्यामुळे ते दुरूस्ती व्हावी अशी मागणी वेळोवेळी स्थानिकांनी म्हाडा आणि महानगरपालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र म्हाडासह महानगरपालिका प्रशासनाने या मागणीकडे डोळे झाक केली. ज्यामुळे रामनगर येथील शौचालयाची दुरुस्ती न झाल्याने त्याचा काही भाग कोसळला. त्यात 2 नागरिकांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

महापालिकेने जबाबदारी झटकली

वारंवार दुरूस्तीची मागणी होऊनही म्हाडा प्रशासनाने दुर्लक्ष केले. तसेच महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली असता, त्यांनी सुद्धा म्हाडाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकली. ज्यामुळे रामनगर येथील शौचालयाचा भाग कोसळला आणि दोघे जखमी झाले.

शौचालय सील

यानंतर रामनगर येथील शौचालयाचा भाग कोसळ्याची माहिती देत महापालिका अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्यानंतर त्यांनी तातडीने या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर त्यांनी हे शौचालय सील केले. तसेच पर्यायी व तातडीची व्यवस्था म्हणून पोर्टेबल शौचालय उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यानंतर पोर्टेबल शौचालय लगेच उपलब्ध होतील असे महापालिका अधिकार्‍यांनी आश्वासित केले.

इतर बातम्या :

MNS Loudspeaker Meet : सरकार भोंग्यावर ठाम, सर्वपक्षीय बैठकीनंतर मनसेही भूमिकेवर ठाम, नांदगावकर म्हणतात, 3 मेचं अल्टीमेटम कायम

Gadchiroli Crime | अहेरीत जवानाने गोळ्या झाडून स्वत:ला संपविले; माजी पालकमंत्र्यांच्या घरासमोरील घटनेने खळबळ

Mumbai Heroine Seized : मुंबईला ड्रग्जच्या विळख्यात ढकलण्याचं षडयंत्र? बोरीवलीतून 50 लाखांच्या हेरॉईनसह गर्भवती महिलेला अटक