Satara | दोन गटात तुफान हाणामारी, सुमारे 20 ते 25 तरुणांमध्ये राडा

| Updated on: Feb 12, 2022 | 3:54 PM

सातारा (Satara) शहरालगत असणाऱ्या करंजे भागात शुक्रवारी रात्री  दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत काहीजण जखमी (Injured) झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल नव्हती. मात्र परिसरात तणावाचे वातावरण होते.

Follow us on
सातारा (Satara) शहरालगत असणाऱ्या करंजे भागात शुक्रवारी रात्री  दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत काहीजण जखमी (Injured) झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास करंजे गावात मारहाणीची घटना घडली. दोन गटातील युवक समोर समोर आले होते. जवळपास 20 ते 25 युवकांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती. यावेळी दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. तसेच काहीजणांच्या हातात धारदार शस्त्रे होती. मारहाणीचा हा प्रकार बराच वेळ सुरू होता. या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण झाले असून ही हाती क्लिप पोलिसांच्या हाकी लागली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल नव्हती. मात्र या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.