शिंदे गटाच्या मंत्र्यांचे भुवया उंचवणारे विधान…संजय राऊत यांच्याबद्दल हे काय बोलून गेले ?

| Updated on: Nov 11, 2022 | 6:08 PM

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे संजय राऊत यांची यांची नुकतीच जामीनावर तरुंगातून सुटका झाली आहे. तब्बल 103 दिवस संजय राऊत हे पत्राचाळ गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटकेत होते.

शिंदे गटाच्या मंत्र्यांचे भुवया उंचवणारे विधान...संजय राऊत यांच्याबद्दल हे काय बोलून गेले ?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नुकताच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. त्यावरून संजय राऊत यांची सुटका झाल्यानंतर राऊत यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. यावेळी शिंदे गटाकडून मात्र बोलणं टाळलं जात असतांना शिंदे गटाचे मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी एक भुवया उंचवणारे विधान केले आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असून कोणीही आनंद साजरा करू शकत. संजय राऊत यांना मानणारा वर्ग आहे, ज्यांना आनंद आहे, ते साजरा करत आहेत. संजय राऊत जेलबाहेर आले आहेत, त्यामुळे अनेकजण आनंद साजरा करत आहेत. चुकीचं काही नाही असं शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी म्हंटलं आहे. खरंतर शिंदे गटाकडून राऊत यांच्या सुटकेवर कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही, त्याबद्दल प्रवक्ते बोलतील असं बोललं जात असतांना भुसे यांचं बोलणं आणि दिलेली प्रतिक्रिया भुवया उंचावून टाकणारी आहे.

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे संजय राऊत यांची यांची नुकतीच जामीनावर तरुंगातून सुटका झाली आहे. तब्बल 103 दिवस संजय राऊत हे पत्राचाळ गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटकेत होते.

संजय राऊत यांच्या जामीनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य न करता याबद्दल प्रवक्ते बोलतील अशी प्रतिक्रिया दिली होती, मंत्र्यांना देखील यावर न बोलण्याचा सल्ला दिला होता.

हे सुद्धा वाचा

असे असतांना मात्र संजय राऊत यांना मानणारा एक वर्ग असल्याचे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी म्हंटलं असून त्यात आनंद साजरा करणं चुकीचे नाही असं म्हंटल्यावर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत बोलत असतांना संजय राऊत यांच्याबद्दल हे विधान केले आहे.

राऊत आणि भुसे यांच्यातील सख्य सर्वांना ठाऊक आहे. मात्र, शिवसेनेत फुट पडल्यानंतर भुसे आणि राऊत यांच्यात वाद निर्माण झाला होता त्यातच भुसे यांची सौम्य प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.