दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘गिफ्ट’, पदोन्नतीसंदर्भात मोठा निर्णय, तब्बल 45 हजार पोलिसांना होणार थेट फायदा

| Updated on: Oct 15, 2021 | 1:38 PM

पोलीस दलातील तब्बल 45 हजार पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना थेट फायदा होणार आहे. तसेच पोलीस शिपायांना पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त होण्याची संधी मिळणार आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर गिफ्ट, पदोन्नतीसंदर्भात मोठा निर्णय, तब्बल 45 हजार पोलिसांना होणार थेट फायदा
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने पोलिसांच्या पदोन्नतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णायामुळे पोलीस दलातील तब्बल 45 हजार पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना थेट फायदा होणार आहे. तसेच पोलीस शिपायांना पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त होण्याची संधी मिळणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर घेण्यात आलेल्या पदोन्नतीच्या या निर्णयामुळे पोलीस दलात सध्या आनंदाचे वातावरण आहे.

पदोन्नतीचा नेमका निर्णय काय आहे ?

राज्य सरकारने पदोन्नती संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे अंमलदारास कमी कालावधीत अधिकारी पदावरुन निवृत्त होता येईल. या नव्या निर्णयामुळे अधिकारी दर्जाच्या पोलिसांची संख्या वाढेल. तसेच पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशा तपासी अंमलदारांच्या संख्येमध्येही वाढ होईल. या निर्णयामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास तसेच सामान्य नागरिकांची मदत घेण्यात अधिक सुलभता येऊन पोलीस दलाचे मनोबल वाढेल. यामुळे गुन्हे उघडकीस येण्याच्या व रोखण्याच्या प्रमाणामध्ये निश्चितच भरीव वाढ होईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे.

पदोन्नतीसाठी जास्त कालावधी लागत असल्यामुळे नाराजी 

सरकारच्या नव्या निर्णयामुळे आता पोलीस शिपायांना आपल्या 35 वर्षाच्या कार्यकालात पोलीस उपनिरीक्षक या पदावरुन सेवानिवृत्त होता येईल. पोलीस शिपायांना आपल्या सेवाकाळात बारा ते पंधरा वर्षानंतर पदोन्नती मिळते. पदोन्नतीसाठी एवढा जास्त कालावधी लागत असल्यामुळे पोलिसांमध्ये काहीशी नाराजी दिसून येते. मात्र, या नव्या निर्णयामुळे पोलिसांत नवी स्फूर्ती येईल.

वरिष्ठ पातळीवर पदसंख्या कमी

पोलीस अंमलदारांना शिपाई, नाईक, हलालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशी पदोन्नती मिळते. एका पदावर दहा वर्षे सेवा दिल्यानंतर नियमानुसार पदोन्नती मिळायला पाहिजे. पण वरच्या पातळीवर पदसंख्या कमी असते. त्यामुळे पदोन्नतीसाठी मोठा कालावधी लागतो. याच कारणामुळे अनेकजण सहाय्यक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरूनच निवृत्त होतात. पण नव्या निर्णयामुळे पोलिसांना लवकर पदोन्नती मिळणार आहे.

इतर बातम्या :

‘मेळाव्याला बोलावलं नाही तर श्रोत्यांमध्ये बसणार,’ जानकर म्हणतात भाऊ म्हणून पंकजा मुंडेंच्या कायम पाठीशी

जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है म्हणू नये, गुलाबराव पाटलांनी मनसेला फटकारलं

जितेंद्र आव्हाड यांच्या अटक आणि सुटकेची बातमी गुप्त का राहिली?, बातमी कशी फुटली?; वाचा सविस्तर