AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है म्हणू नये, गुलाबराव पाटलांनी मनसेला फटकारलं

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मनसेच्यावतीनं गर्व से कहो , हम हिंदू है, असे पोस्टर्स शिवसेना भवन समोर लावण्यात आले आहेत. मनसेच्या या प्रयत्नाला स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.

जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है म्हणू नये, गुलाबराव पाटलांनी मनसेला फटकारलं
गुलाबराव पाटील
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 12:30 PM
Share

जळगाव: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मनसेच्यावतीनं गर्व से कहो , हम हिंदू है, असे पोस्टर्स शिवसेना भवन समोर लावण्यात आले आहेत. सेनेच्या हिंदू भूमिकेवर अनेक वेळा प्रश्न केले जात असताना सेना भवनासमोर मनसेने अशाप्रकारचे बॅनर लावून एक प्रकारे सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या या प्रयत्नाला स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है म्हणू नये, अशा शब्दात पाटील यांनी मनसेवर टीका केली आहे.

त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है म्हणू नये

मनसेने मुंबईत केलेल्या बॅनरबाजीचा गुलाबराव पाटील यांनी चांगलाच समाचार घेतलाय. मनसेने स्थापनेवेळी सर्वधर्म समभावचा नारा दिला होता. पण, नंतर त्यांनी परप्रांतीयांच्या कानात मारली आणि झेंडा बदलला. पुन्हा मराठीपणा आणला. आज ते म्हणताय की गर्वसे कहो हम हिंदू है. मात्र, गर्वसे कहो हम हिंदू है असे आमचे बापजादे म्हणत होते. ही सर्व शिवसेनेचीच पिलावळ आहे, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी मनसेवर तोफ डागली.

35 वर्षांनी गावाकडं दसरा

शिवसेनेचा आज दसरा मेळावा होत आहे. ही परंपरा आहे. पण आज 35 वर्षांनी मी दसरा गावाकडे साजरा करणार आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हा बँकेसाठी शिवसेनेचीही स्वबळाची तयारी

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणूकसाठी सर्वपक्षीय पॅनलबाबत प्रयत्न सुरू आहेत. पण जर एकमत होत नसेल तर शिवसेनाच काय तर प्रत्येक पक्ष वेगळा लढेल. शिवसेनेची स्वबळाची तयारी आहे. बँक अ वर्गात ठेवायची असेल तर निवडणूक बिनविरोध होण्याची गरज आहे, असे मतही गुलाबराव पाटील यांनी मांडले.

भाजपनं महापौर बदलून दाखवावं

जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा बहुमतात आलं आहे, असा दावा केला जातोय. त्यांनी महापौर बदलून दाखवावा, असे थेट आव्हानही गुलाबराव पाटील यांनी दिलंय. भाजपच्या नगरसेवकांनी गटनेतेपदाच्या नोंदणीसाठी दोन्ही पक्षांकडे नोंदणी केली आहे, असेही ते म्हणाले.

इतर बातम्या:

Video: सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, गुलाबराव पाटलांनी पुन्हा भरसभेत ‘बाप’ काढला!

Video: बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक, बाळासाहेबांच्या हवाल्यानं गुलाबराव पाटलांकडून ‘राड्या’ची फोड

Shivsena Leader Gulabrao Patil gave answer to poster installed by MNS in front of Shivsena Bhavan

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.