Video: सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, गुलाबराव पाटलांनी पुन्हा भरसभेत ‘बाप’ काढला!

Gulabrao Patil | गाडी चालवायची असेल तर लायसन्स लागत. कुठलंही काम करायचं असेल तर पात्रतेसाठी तुम्हाला प्रमाणपत्र लागतं. पण शरद पवार यांनी असं काही केलं की, बिना लायसन्सचा ड्रायव्हर थेट व्होल्वो गाडीवर बसवला.

Video: सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, गुलाबराव पाटलांनी पुन्हा भरसभेत 'बाप' काढला!
गुलाबराव पाटील, शिवसेना नेते

सोलापूर: शिवसेना असं रसायन आहे की, ज्यामुळे अगदी सामान्य लोकही आमदार, खासदार आणि मंत्री झाले. अगदी सायकल चोरणारे नारायण राणे यांनाही मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान मिळाला, असे वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, शिवसेनेमुळे टोपली फिरवणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले, मुरारी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले, रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले, पानटपरी चालवणार गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून उभा आहे. हे सोडा, पण सायकल चोरणारे नारायण राणेही शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले, असे गुलाबराव पाटील यांनी यांनी म्हटले. त्यामुळे आता नारायण राणे या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

‘पवार साहेबांनी बिना लायसन्सच्या ड्रायव्हरला व्होल्वो चालवायला दिली’

राज्यातील माहाविकात आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते असा दावा भाजपकडून केला जातो. तर दुसरीकडे आमचे सरकार पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं सत्ताधारी सांगत असतात. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर टीका केली आहे. सरकार काहीही केलं तर कोसळणार नाही हे सांगण्यासाठी त्यांनी गाडी, ड्रायव्हर, कंटडक्टर आणि प्रवाशी असा दखला देत विरोधकांना घेरलं. गुलाबरावांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

… म्हणून नारायण राणेंचं डोकंही सूक्ष्म झालंय, गुलाबराव पाटलांचा निशाणा

मला माहिती आहे, गाडी चालवायची असेल तर लायसन्स लागत. कुठलंही काम करायचं असेल तर पात्रतेसाठी तुम्हाला प्रमाणपत्र लागतं. पण शरद पवार यांनी असं काही केलं की, बिना लायसन्सचा ड्रायव्हर थेट व्होल्वो गाडीवर बसवला. उद्धव ठाकरे ड्रायव्हर, अजित पवार कन्डक्टर आणि बाळासाहेब थोरात प्रवासी झाले. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की हा ड्रायव्हर अपघात करेल. ज्याने आयुष्यात गाडी चालवली नाही त्याला थेट व्होल्वो गाडी देण्यात आली. पण दोन वर्षामध्ये किती टेकड्या, पहाड आले. तरीही आमची तीन लोकांची गाडी सुस्साट चालत आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी : संजय राऊत

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था वाघाला पाहून भेदरलेल्या मेंढरांसारखी झालेय’

जो पत्ता करतो गुल, पॉवरफुल्ल… यंदा गुलाल आमचाच, सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीची विजयी घोडदौड

Published On - 12:02 pm, Fri, 15 October 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI