जो पत्ता करतो गुल, पॉवरफुल्ल… यंदा गुलाल आमचाच, सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीची विजयी घोडदौड

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलची विजयाकडे घौडदौड सुरु आहे. या निवडणुकीचा निकाल काही क्षणांत स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी सोमेश्वर विकास पॅनलचे पाच पैकी दोन गटातील उमेदवार विजयी झाले आहेत.

जो पत्ता करतो गुल, पॉवरफुल्ल... यंदा गुलाल आमचाच, सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीची विजयी घोडदौड
SOMESHWAR SUGAR INDUSTRY


पुणे (बारामती) : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलची विजयाकडे घौडदौड सुरु आहे. या निवडणुकीचा निकाल काही क्षणांत स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी सोमेश्वर विकास पॅनलचे पाच पैकी दोन गटातील सात उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत आहे.

विरोधकांचं डिपॉझिट जप्त होणार, राष्ट्रवादीचा दावा 

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पहिल्या आणि दुसऱ्या गटातील उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यामुळे राष्ट्रवादी गटात आनंदाचे वातावरण आहे. या दोन्ही गटांत सातपैकी सहा उमेदवार 15,000 पेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य असल्यामुळे विरोधी पॅनलचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केला.

राष्ट्रवादीने 7 जागा जिंकल्या, परिवर्तन पॅनल अजूनही शून्यावर

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण तालुक्यात एकूण 83 मतदान केंद्रांवर मतदान झाले. यामध्ये 25 हजार 538 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 12 ऑक्टोबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. सध्या हाती आलेल्या निकालानुसार साखर कारखान्याच्या एकूण 21 पैकी 7 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. तर भाजपच्या सोमेश्वर परिवर्तन पॅनलला अद्याप खातंदेखील उघडता आलेलं नाही. अजूनही 14 जागांचे निकाल बाकी आहेत.

महत्त्वाचे मुद्दे :

– मतमोजणीसाठी 41 टेबल असून 220 कर्मचारी तैनात 

– सोमेश्वर विकास पॅनल आणि सोमेश्वर परिवर्तन पॅनल यांच्यात लढत 

– 20 जागांसाठी एकूण 46 उमेदवार रिंगणात 

– उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला

इतर बातम्या :

आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, संभाजी छत्रपतींनी चळवळीचं नेतृत्व करावं; चंद्रकांतदादांचं आवाहन

शिवसेनेची रणरागिणी चाकणकरांच्या मदतीला धावली, मनीषा कायंदेंकडून चित्रा वाघ यांचा खरपूस समाचार

लहान मुलांच्या लसीकरणाचा महापालिकेचा प्लान तयार, तीन दिवसात लसीकरणाला सुरुवात; सुरेश काकाणींची मोठी माहिती

(someshwar sugar industry election result ncp 7 candidate won opposition on zero)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI