सोमेश्वर कारखाना निवडणुकीत 94 अर्ज बाद, अनेक दिग्गजांचा समावेश, भाजपच्या पॅनललाही मोठा धक्का

भाजपच्या पॅनलचे सूत्रधार पुणे बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप खैरे यांचाही अर्ज अवैध ठरलाय. हा भाजपच्या पॅनलसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

  • नाविद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती
  • Published On - 19:49 PM, 23 Feb 2021
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत 94 अर्ज बाद, अनेक दिग्गजांचा समावेश, भाजपच्या पॅनललाही मोठा धक्का

बारामती : बारामतीच्या सोमेश्‍वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आज (23 फेब्रुवारी) अर्ज छाननी झाली. यात 632 अर्जांपैकी तब्बल 94 अर्ज बाद झाले आहेत. विशेष म्हणजे बाद झालेल्या अर्जांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. भाजपच्या पॅनलचे सूत्रधार पुणे बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप खैरे यांचाही अर्ज अवैध ठरलाय. हा भाजपच्या पॅनलसाठी मोठा धक्का मानला जात आहे. खैरे यांच्या प्रमाणेच निरेचे माजी सरपंच राजेश काकडे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे मेहुणे दिलीप यादव यांच्यासह काही दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक अर्ज बाद होण्याचा विक्रमही या कारखान्याच्या निवडणुकीत नोंदवला गेलाय (Many Election application canceled in Someshwar Sugar factory election Baramati).

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांकरता तब्बल 632 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये एकट्या 22 फेब्रुवारी रोजी सर्वाधिक 381 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 94 उमेदवारी अर्ज अपात्र ठरले असून 538 अर्ज वैध ठरलेत. यामध्ये सर्वाधिक अवैध अर्ज होळ मोरगाव गटात झाले असून या गटामध्ये 18 जणांचे अर्ज अवैध ठरले.

सर्वाधिक अर्ज बाद होण्याचा विक्रमही या कारखान्याच्या निवडणुकीत

सर्वाधिक उमेदवारी अर्ज निंबूत खंडाळा गटांमध्ये आले आहेत. त्याचे 105 अर्जांपैकी 91 अर्ज या निवडणुकीत वैध ठरले. तर त्या खालोखाल मुरूम वाल्हा या दुसऱ्या गटाच्या मतदार संघात 93 पैकी फक्त 4 अर्ज अवैध ठरले असून 89 अर्ज वैध ठरले. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज संध्याकाळी अर्ज छाननीचा गोषवारा प्रसिद्ध केला आहे.

आज झालेल्या अर्ज छाननीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या पॅनेलची धुरा असलेले पुणे बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप खैरे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे मेहुणे दिलीप यादव, निरेचे माजी सरपंच राजेश काकडे यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

‘चुकीच्या नंदनवनात राहू नका’, अजित पवारांकडून आगामी निवडणुकांवर सूचक भाष्य

…आणि अजितदादांच्या एका फोनमुळे जालिंदर काकांवर उपचार, पवारांचं हळवं रुप पुन्हा जगासमोर

अजितदादांचा अनोखा अंदाज, आधी सायकलची पाहणी, मग दिव्यांगांशी संवाद

व्हिडीओ पाहा :

Many Election application canceled in Someshwar Sugar factory election Baramati